महाराष्ट्रातील शेतक-यांची कर्ज माफी होणार नाही, कारण पहा
मुंबई, ता. 12 – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशी मोठी घोषणा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या आपल्या विविध सभेच्या वेळी दिली होती मात्र आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, हे आता एका मोठ्या व्यक्तींना म्हणजे अजित दादा पवार यांनी स्पष्ट केलेला आहे.
आता कर्जमाफी होणार नसल्यामुळे कर्जमाफीच्या अशावर बसलेले शेतकरी मात्र संभ्रमात सापडलेले आहेत. शेतकऱ्यांना आता काय करावं असा प्रश्न पडलेला आहे. नेमकं सरकार आपल्याशी खोटे बोलून मते मिळवून सत्तेत आलं, मात्र ज्या शेतकऱ्यांनी महायुतीला मतदान केलं, मात्र त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार नसल्याने शेतकरी चिंतेत सापडलेले आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसेल तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा भाजपाच्या जाहीरनाम्यात उल्लेख केलाच कसा. असा प्रश्न शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
अनेक दाखले देत अजित पवारांच्या विधानावर त्यांनी नाराजी केली व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. नाहीतर हीच शेतकरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार आणि अनिल देशमुख यांनी दिलाय.
एकीकडे अर्थमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आश्वासन दिल नव्हतंच असं म्हणताय, त्याला आता त्यांच्याच मित्रपक्षाने आव्हान दिलाय, तेव्हा भाजपाने मित्र पक्षाविरोधात थेट भूमिका घेतल्याचं दरेकरांच्या विधानावरून लक्षात येत.
लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात पैसे वाटल्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्ज माफ होणार नाही असा अंदाज लावल्या जात आहे. मात्र खरोखर ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी किंवा भाजपाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती. आता खरोखर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की शेतकऱ्यांची कर्जमाफी वाऱ्यावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कर्जमाफीचा आश्वासन दिलाच नव्हतं असं म्हणणारे अजित पवार जरी असले, तरी महायुतीमध्ये सध्या विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे नेतृत्व करतात. कर्जमाफी जाहीरनामा हा भाजपानेच काढला होता. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कर्जमाफी होणार की नाही याबाबत देवेंद्र फडणवीस यांचे कुठलाही स्टेटमेंट नसल्यामुळे हा एक संभ्रमाचा विषय आहे.
जर खरोखर देवेंद्र फडणवीस यांनी अशीच भूमिका घेतली तर शेतकऱ्यांचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही .मात्र देवेंद्र फडणवीस यावर काय निर्णय घेतात हे फार महत्त्वाचे ठरणार आहे.