नाशिक क्राईम

महिलेची लुटमार करणारे चोरटे १२ तासात जेरबंद 

स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनची कामगिरी


 

वेगवान नाशिक/Wegwan Nashik –

 विशेष प्रतिनिधी, 8 जानेवारी – 

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

जानेवारी दि.०७ रोजी मध्यरात्रीचे सुमारास तळेगाव दिघे, ता.संगमनेर येथील रहिवासी महिला हि नांदुरशिंगोटे येथे जाण्यासाठी एका पांढ-या रंगावे पिकअप वाहनास हात दाखवुन नाशिकरोड येथुन प्रवासी म्हणून बसली होती.

दरम्यान पिकअप वाहनावरील चालक व गाडीतील एक इसम यांनी नाशिक ते पुणे महामार्गावर मोहदरी घाटामध्ये रोडच्या कडेला पिकअप गाडी थांबवुन, यातील प्रवासी महिलेस चाकुसारखे धारदार शस्त्राचा धाक दाखवुन सोने, चांदीवे दागिने, मोबाईल फोन व बॅग असा एकुण १२ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन, सदर महिलेस गाडीचे खाली उतरुन लोटुन दुवन तिस दुखापत झाल्याने MIDC सिन्नर पोलीस ठाणे येथे गुरनं ०६/ २०२५ भा.न्या.सं कलम ३०९(४), ३०९(६), ३९१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने,अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी सदर घटनेतील अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेसाठी स्थानिक गुन्हे शाखा व सिन्नर पोलीस ठाणेस सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजु सुर्व व सिन्नर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी सदर गुन्हयातील फिर्यादी यांचेकडे चौकशी करून, यातील अज्ञात आरोपीनी गुन्हयात वापरलेली पिकअप गाडी, तसेच आरोपीचे वर्णन, अंगावरील पेहराव व बोलीभाषा यावरून सदरचे गुन्हेगार हे सिन्नर शहराचे आसपासचे गावातीलच असल्याचा तर्क लावुन तपास सुरु केला.

त्यानुसार खब-यांमार्फत गोपनीय माहिती घेवुन, संशयीत नामे १) संदिप विठ्ठल वाघ, वय २८, रा. मापारवाडी, ता.सिन्नर,२ ) रोहित मधुकर लहाने, वय २४, रा. सोनगिरी, ता. सिन्नर यांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेत वरील गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी दोघांनी मिळून नाशिकरोड येथुन एका महिलेस त्यांचेकडील पिकअप गाडीमध्ये प्रवासी म्हणुन बसवुन, मोहदरी घाट परिसरात तिस चाकुचा धाक दाखवुन तिचे अंगावरील सोने व चांदीवे दागिने, मोबाईल व बँंग जबरीने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

 

सदर आरोपीना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली पिकअप गाडी क्रं.एम.एच.१५.जे.सी.८७९१ तसेच जबरीने चोरून नेलेले सोने, चांदीचे दागिने, विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण ९,०९,००0/- रू.किं.चा मुद्देमाल जप्त करप्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणेकडील सपोनि दिपक सुरवाडकर हे करीत आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यंचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीभक राजु सरवे, एमआयडीसी सिन्नर पो.स्टे. वे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, विं. गवळी तसे एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनचे सपोनि दीपक सुरवाडकर, पोउनि किशोर पाटील, पोहवा भगवान शिंदे,योगेश शिंदे प्रकाश उंबरकर, जयेश खाडे, प्रशांत सहाणे, नितीन काकड यांचे पथकाने वरील आरोपीना ताब्यात घेवुन १२ तासांचे आत सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!