नाशिक ग्रामीण
स्वर्गीय, सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची सजा व्हावी … !
सिन्नर मराठा महासंघाचे तहसीलदारांना निवेदन
वेगवान नाशिक : भाऊसाहेब हांडोरे
- सिन्नर , दि, ७ जानेवारी २०२५ – अखील भारतीय सरपंच नावाला काळीमा फासणारी घटना टाळण्यासाठी संबंधित मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे , भर दिवसा अपहरण करून मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची नियोजित कट रचून अतिशय अमानवीय,निर्घृण हत्या, करण्यात आली त्याबाबत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सिन्नर मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे भर दिवसा अपहरण करून नियोजित कट रचून निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी निरापराध सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली. ज्या आरोपींनी निरापराध सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्या आरोपींना स्थानिक राजकीय नेत्यांचे अभय असल्याने अशा जातीवादी राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच संबंधित आरोपींची तसेच अभय देणाऱ्या राजकीय नेत्यांचे मोबाईल लोकेशन सीडीआर काढून योग्य ती चौकशी करून कारवाई व्हावी व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन मराठा समाजाला न्याय देण्यात यावा अन्यथा लोकशाही व प्रशासनावरचा जनतेचा विश्वास उडल्या शिवाय राहणार नाही, *संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, आणि या सर्व आरोपींना कठोर शासन होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून हटवण्यात यावे.अन्यथा राज्यभर राष्ट्रीय मराठा महासंघ रस्त्यावर उतरून राज्य सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ,समाजाला घातक अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याची मागणी राष्ट्रीय मराठा महासंघ यांच्यावतीने करण्यात आली . यावेळी सचिन भाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली तसेच दिनेश जाधव (सिन्नर तालुका अध्यक्ष) यांच्यावतीने सोमवार दिनांक 6 /1 /2025 रोजी मा. श्री नायब तहसीलदार मुंदडा साहेब( सिन्नर )यांना निवेदन देण्यात आले. यावेळेस तेजस गुरुळे (सिन्नर तालुका उपाध्यक्ष), संतोष वाघे( सिन्नर तालुका संघटक), ईश्वर थोरात (सरचिटणीस), सुदाम घोडे सिन्नर ता. चिटणीस, - राष्ट्रीय मराठा महासंघ सिन्नर तालुका आज दिनांक:-06/01/2025 रोजी.*(राष्ट्रीय अध्यक्ष)श्री.बन्सी दादा डोके यांच्या आदेशाने तसेच (राष्ट्रीय सरचिटणीस)श्री.संजयजी निरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सचिन भाऊ राऊत (जिल्हाध्यक्ष नाशिक)यांच्या नेतृत्वाखाली आज विषय. गाव. मस्साजोग, तालुका.केज,जि . बीड, येथील सरपंच कै. संतोष भैया देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना फाशीची शिक्षा होणे बाबत आज राष्ट्रीय मराठा महासंघ सिन्नर तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन देताना पदाधिकारी*दिनेश सुरेश जाधव सिन्नर तालुकाप्रमुख, तेजस रंगनाथ गुरुळे सिन्नर तालुका उपाध्यक्ष, संतोष नाना वाजे सिन्नर तालुका संघटक, सुदाम सोपान घोडे( देवा भाऊ घोडे) सिन्नर तालुका चिटणीस, ईश्वर राजेंद्र थोरात सिन्नर तालुका सरचिटणीस, सुनील भाऊ घोडे आदी उपस्थित होते.