महाराष्ट्रातील शेतक-यांची कर्जमाफी होणार की नाही .. पहा
वेगवान नाशिक
मुंबई, ता. 5 जानेवारी 2025 – शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होईल असा गाजावाजा करत महायुतीने विधानसभेच्या वेळी मोठी गर्जना केली. मात्र शेतकऱ्यांना अजून पर्यंत कर्जमाफी झाली नाही.
कर्जमाफीची घोषणा कधी होईल याकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या लक्ष लागून आहे सरकारने येथून मागे दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली होती मात्र अनेक शेतकऱ्यांचे कर्ज हे दोन लाखापेक्षा जास्त होतं. अनेक शेतकऱ्यांचा कर्ज दोन लाख, ते दोन लाख 90 हजार तर काही शेतकऱ्यांचा तीन लाखापर्यंत कर्ज होतं. ते कर्ज अजून पर्यंत शेतक-यांचे तसेच पडून आहे.
लाडक्या बहिणींमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला खोडा बसलाय, अशी चर्चा आहे. एवढाच नाही तर लाडक्या बहिणींसाठी खर्च होणाऱ्या पैशामुळे महाराष्ट्राचा बजेट कोलमडत चालले आहे असा आरोप केला जातोय.
डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार या विवांचनेत शेतकरी अडकून पडलाय. सरकारकडून कर्ज माफीबाबत कुठल्याही पध्दतीची माहिती दिली जात नाही.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या वित्त विभागाने राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवले होते. लाडकी बहीण योजनेसाठी त्यावेळी निधीची भार नको, असे मत विभागाने नोंदवले होते. आता कॅगच्या अहवालात राज्य सरकारच्या जमा आणि खर्चात ताळमेळ नसल्याचे म्हटले आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी आशा लागून राहिलेली आहे. देवेंद्र फडणवीस तसेच महायुतींच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. अशा मोठ्या घोषणा दिल्या. विधानसभा होऊन अनेक दिवस उलटून गेले असले तरी आणि महायुतीचे सरकार स्थापन झालेला असला तरी अजून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी मिळेल याच्याबाबत एकही राजकीय नेता बोलण्यास तयार नाही महाराष्ट्राचे कृषिमंत्री म्हणून सिन्नरच्या आमदार कोकाटे माणिकराव कोकाटे यांची नियुक्ती झालेली आहे