लोखंडी अँगलची चोरी करणारे सराईत चार गुन्हेगार ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई
वेगवान नाशिक/wegwan nashik
विशेष प्रतिनिधी ५ जानेवारी –
गेल्या आठवड्याभरापूर्वी सिन्नर तालुक्यातील वनपरिक्षेत्र हद्दीच्या तार कंपाऊंडला लावलेले सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे लोखंडी अँगल चोरीसाठी वापरलेली महिंद्रा पिकअप व चार सराईत गुन्हेगार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या नाशिक ग्रामीणच्या पथकाने तालुक्यातील पास्ते शिवारात सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीत दि २५/१२/२४ रोजी पागांरवाडी ता सिन्नर येथील शासकीय वनविभागाचे वनक्षेत्रातुन राखीव क्षेत्राचे तारंकपाउडचे लोखंडी ॲगंल चोरीस गेलेले होते तसेच या प्रकारचे सिन्नर पोलीस ठाणेत एकुन ०६ गुन्हे दाखल होते अँगल चोरी करणा-या टोळीचा ब-याच दिवसांपासुन सिन्नर तालुका परिसरात धुमाकूळ सुरू होता.
- सदर गुन्हयांचे संमातर तपास हे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामिण यांचेकडुन सुरु असतांना पोनि/ राजु सुर्वे यांना गोपनिय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की सदरचे गुन्हे हे रेकॅार्डवरील गुन्हेगार रतन चिमा माळी रा. पास्ते ता.सिन्नर व त्याचे साथीदारांनी केलेले असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने पास्ते शिवारात सापळा रचुन चोरी करण्यासाठी वापरात.
- असलेले पिकअप वाहन क्र MH 42 B 3734 ही पकडुन त्यात चोरी करण्यासाठी जात असलेले ईसम १) रतन चिमा माळी रा पास्ते ता सिन्नर २)ईरसाद उर्फ लंबु मसुद अली रा गोजरे मळा सिन्नर मुळ रा कानपुर ३)कल्पेश पांगळु साबळे रा ST कॅालनी सिन्नर ४) भंगार विक्रेता -मनावर मंहमद अली रा अबंड नाशिक यांना ताब्यात घेतलेले असुन त्यांचेकडुन सिन्नर पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील
- 1) 215/24 IPC 379 2)280/24 IPC 379 3 )359/24 IPC 379 4)556/24 BNS 303(2) 5)644/24 BNS 303(2)6 ) 06/25 BNS 303(2)हे गुन्हे उघडकीस आलेले असुन आरोपींकडून गुन्हात वापरेले महिंद्रा पिकअप वाहन जप्त करण्यात आलेले आहे.
- यातील आरोपी क्र १,२,३ यांचेवर यापुर्वी सिन्नर व सिन्नर MIDC पोस्टे येथे गुन्हे दाखल आहेत. आरोपीतांकडुन एकुन २,५९,५००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने , अप्पर पोलीस अधिक्षक आदीत्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/राजू सुर्वे , सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार , पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम, प्रकाश कासार यांचे पथकाने केलेली आहे