नाशिक शहर

या मान्यवरांचा होणार ‘कार्यगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान 

दर्पणकार जांभेकर यांच्या जयंतीदिनी होणार पुरस्कारांचे वितरणव


 

वेगवान नाशिक/वेगवान नाशिक :- 

विशेष प्रतिनिधी, ४ जानेवारी :-

मराठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नाशिक मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारे’ कार्यगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले असून यात प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया कला, क्रीडा, कृषी, धार्मिक, शैक्षणिक, वृत्तपत्र विक्रेते, उद्योजक, सामाजिक संस्था आदींसह ४० जणांचा कार्यगौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार असल्याचे तालुका अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

जेलरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालय येथे सोमवार दि.६ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार ऍड.राहुल ढिकले तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सरोज आहिरे, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्या प्रीतम आढाव, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी रतन चावला, व्यापारी बँकेचे संचालक गणेश खर्जुल, एकलरे येथील माजी सरपंच सागर जाधव आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. नाशिक तालुका पत्रकार संघाची अध्यक्ष सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी पुरस्कार्थीची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रिंट मीडियासाठी फणींद्र मंडलिक (महाराष्ट्र टाइम्स ),नरेंद्र जोशी (देशदूत), दिलीप सोनार (गावकरी), तुषार माघाडे (सकाळ), नरेंद्र दंडगव्हाळ (लोकमत ), विजय गीते (पुण्यनगरी), प्रदीप गायकवाड (दिव्यमराठी ), नाना खैरनार (भ्रमर ), स्वप्निल लेकुरवाळे ( आपलं महानगर), दिलीप सूर्यवंशी (पुढारी), कुंदन राजपूत (लोकनामा), सुधीर पेठकर (नवराष्ट्र), संजय देवधर (न्यूज मसाला ), संदीप नवसे (जागर जनस्थान ), साहिल बेलसरे (9 न्यूज महाराष्ट्र) , प्रशांत जेजुरकर (दिशा न्यूज), तेजस्विनी ताकाटे (एनसीएन न्यूज) यांसह वृत्तपत्र विक्रेते भाग्यश्री माळवे ( नाशिकरोड ), प्रकाश गोडसे (देवळाली कॅम्प ) ज्ञानेश्वर वाघ ( जेलरोड ), मीना वाकचौरे ( गिरणारे ) आदींसह विशेष पुरस्कार्थींमध्ये सरस्वती मित्र मंडळ (देवळाली कॅम्प), वैभव ग्रामीण पतसंस्था (पळसे), आदिशक्ती मित्र मंडळ (माडसांगवी ), जाखोरी क्रांती वाचनालय (जाखोरी), रॉयल रायडर्स (सायकल समूह ), हरिनाम सप्ताह कमिटी (शिंदे ), गजानन महाराज महिला भजनी मंडळ ( भगूर ), स्व गणेश धात्रक शिक्षण संस्था (जेलरोड), हॉलिफ्लॉवर इंग्लिश मीडियम (नाशिकरोड), शुभम शिंदे (पळसे ), प्रवीणशेठ लकारिया (भगूर), भक्ती कोठावळे (नाशिक), राजेंद्र खर्जुल, ( नाशिक रोड), संगीता पिंगळे (मातोरी), शिवाजी माळोदे (नांदूर), दिनेश निकम (जेलरोड), कैलास धात्रक (जाखोरी), किरण गायकवाड (नाशिकरोड), पंकज शेलार (विजयनगर) आदींचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला जाणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, ज्येष्ठ सदस्य नरेंद्र पाटील, अध्यक्ष सुनील पवार, कार्याध्यक्ष अरुण बिडवे, सरचिटणीस अरुण तुपे यांसह पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!