नाशिक शहर

राज्यात आदर्श ठरलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची कार्यकारिणी झाली जाहीर

अध्यक्षपदी योगेश गाडेकर तर या मान्यवरांचा झाला कार्यकारणीत समावेश


वेगवान नाशिक/ Wegwan Nashik. 

विशेष प्रतिनिधी, ४ जानेवारी :-  

अवघ्या राज्यभरामध्ये शिवजन्मोत्सव समितीचा आदर्श निर्माण करणाऱ्या नाशिकरोड-जेलरोड शिवजन्मोत्सव समिती २०२५ च्या अध्यक्षपदी योगेश गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

गेल्या सहा वर्षांपासून राज्यामध्ये एक आदर्श ठरणारा सर्वपक्षीय व सर्वधर्मीय शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी,भारतीय जनता पक्ष, मनसे व इतर पक्ष संघटनांच्या नेते व कार्यकर्त्यांची एकत्र बांधणी करण्यात आली होती. त्यातूनच हा शिवजन्मोत्सव समितीचा पॅटर्न राज्यभरात प्रसिद्ध झाला व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. पुढील महिन्यात १९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवासाठी कार्यकारणीची बैठक नाशिकरोडच्या कदम लॉन्स येथे मावळते अध्यक्ष शिवाजी हांडोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

यावेळी सर्वानुमते आगामी कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी – योगेश गाडेकर, कार्याध्यक्षपदी सुनील सोनवणे, उपाध्यक्षपदी राहुल लवटे व विशाल सातभाई, सरचिटणीसपदी प्रशांत कळमकर,चिटणीसपदी गोकुळ नागरे तर खजिनदारपदी अभय खालकर यांची निवड करण्यात आली. या बैठकीचे प्रास्तविक व सूत्रसंचालन बंटी भागवत तर आभार बाळासाहेब म्हस्के यांनी मानले.

या बैठकीस शिवाजी सहाणे,सूर्यकांत लवटे, संगीता गायकवाड, बंटी कोरडे, राजेश फोकणे, विशाल संगमनेरे,विक्रम कोठूळे,किशोर जाचक,कृष्णा लवटे आदींसह शिवजन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!