‘या’ शहरात मराठीला डावलल्याने मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा
नाशिकमध्ये या भागात जाहिरात फलकांवर मराठी भाषेला डावलून गुजराती भाषेचा वापर
वेगवान नाशिक, Wegwan Nashik.
विशेष प्रतिनिधी, 4 जानेवारी :-
देवळाली कॅम्प येथील लामरोडच्या विविध चौकांमध्ये येथे बाहेरून आलेल्या काही बांधकाम व्यावसायिकांकडून जाहिरातीसाठी वापरण्यात येणाऱ्या फलकांवर मराठी भाषेला डावलून उघडपणे गुजराती भाषेचा वापर होत असल्याने याप्रकरणी येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देवळाली कॅम्प पोलिसात निवेदन देत मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या दोन महिनांपुर्वीच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आणि मराठी हि महाराष्ट्राची राजभाषा आहे. मात्र याच महाराष्ट्रातील देवळाली कॅम्प शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मराठीला डावलून येतील जाहिरातीच्या होर्डिंग व फलकांमध्ये सर्रासपाने गुजराती भाषेचा वापर होत असल्याचे वारंवार मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा निदर्शनास आल्याने मनसेचे तालुकाप्रमुख नितीन काळे यांच्या शीर्षकपत्रावर व नेतृत्वाखाली नवनाथ झोंबाड, सुधीर वाजे, विजय गव्हाणे, संदीप पाटोळे, शुभम चव्हाण,ऋषिकेश गोडसे आदी पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी याविरोधात देवळाली कॅम्प पोलीस स्थानकात काल शनिवार दि.४ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांची भेट घेत गुजराती भाषेचा वापर केलेले होर्डिंग काढून टाकण्याची मागणी केली व गुजराती भाषेतील हे होर्डिंग तात्काळ काढण्याची मागणी करताना मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन निवेदन देण्यासाठी गेलेल्या पदाधिकारी व सदस्यांना दिले.