HDFC आणि SBI च्या लाखो ग्राहकांसाठी महत्वाची बातमी
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2025/01/एफडीमध्ये-पैशाची-गुंतवणूक-780x470.jpg)
नवी दिल्ली, ता. 4 – दोन पैशाची पाडू हवी या उद्देशासाठी लोक पैशाची गुंतवणूक करत असतात, मात्र यासाठी कोणती बँक निवडले गेले पाहिजेत हेही लोक ठरवत असतात. लोकांना बँकेत जर एफडी केली तर खूप कमी पैसे मिळतात. यामुळे अनेक लोक जे आहेत ते बँकेकडे एफडी न करता ते मॅच्युअल फंड कडे आपला पैसा गुंतवतांना दिसत आहे. यामध्ये लोक आपला पैसा गुंतवत असतात.
आपल्या पैशांमध्ये वाढ व्हावी या उद्देश्याने लोक बँकेकडे एफडी करत असतात. खूप कमी पैसे मिळत असल्यामुळे लोक याला फाटा देत असतात. हेच ओळखुन भारतातल्या सगळ्यात मोठ्या खाजगी आणि एक सरकारी बँक म्हणजे जी खासगी एचडीएफसी आणि सरकारी भारतीय स्टेट बँक यांनी आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. एफडी मधील पैसे आता तुम्हाला वाढून मिळणार असल्याचं समोर येत आहे.
हे कश्या पध्दतीने होणाऱ आहे ते तुम्हाला समजून घेणे घरजेचे आहे. बँकांनी ग्राहकांना एफडीवरील व्याज वाढवण्याची घोषणा केली आहे. भविष्यात आणखी काही बॅंक यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता आहे.
एसबीआयने 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची नवीन कॅटेगरी सुरू केली आहे. या कॅटेगरीतील ठेवीदारांना ज्येष्ठ नागरिकांपेक्षा 10 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळणार आहे. एचडीएफसी बँकेने बल्क डिपॉझिट्सवरील परताव्यात 5 ते 10 बेस पॉइंट्सने सुधारणा केली आहे.
एसबीआय बँकेने त्यांच्या योजनेची पुनर्रचना देखील केली आहे. एवढेच नव्हे तर ग्राहक त्यांच्या बचतीचे उद्दिष्ट ठरवू शकतात आणि त्यानुसार आवर्ती ठेवींसाठी साइन अप करू शकतात.
डिसेंबरच्या मध्यापर्यंत बँक ठेवी आणि बँक कर्ज 11.5% च्या समान गतीने वाढत असल्याचे आरबीआयच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे. विकासाला चालना देण्यासाठी धोरणात्मक दरात कपात करण्याची मागणी आरबीआयकडे केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे.
डिसेंबर 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीसाठी व्यवसाय डेटा जाहीर करणारी पहिली मोठी बँक ही बँक ऑफ बडोदा आहे. त्याचे ग्लोबल ॲडव्हान्सेस 11.7% आणि ग्लोबल डिपॉझिट्स 11.8% ने वाढले आहेत.
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/09/वेगवान-मराठी-लोगो-1.png)