देशभरातील इतक्या व या कॅन्टोन्मेंट बोर्डांना मिळाली वर्षभराची मुदतवाढ
वेगवान नाशिक/ Wegavan Nashik –
विशेष प्रतिनिधी, ३ जानेवारी –
गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालखंडापासून देवळालीसह देशातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार हा त्या-त्या कॅन्टोन्मेंट मधील त्रिसदस्यीय समिती मार्फत सुरु आहे. जनतेतून केवळ एकच नामनिर्देशित सदस्य यासाठी देण्यात येत असतो. सध्या असलेल्या या कॅन्टोन्मेंट बोर्डांना लष्कराचे पदसिद्ध असलेले ब्रिगेडियर अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व नामनिर्देशित सदस्यांच्या या त्रिसदस्यीय समितीला आगामी एक वर्षासाठी मुदतवाढ मिळाली आहे.
देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डांसह देवळालीतील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व्हेरिड बोर्डाचा अवधी दि.१० फेब्रुवारी रोजी समाप्त होण्यापूर्वी महिनाभर आधीच संरक्षण मंत्रालयाने या सर्व ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डांची आगामी सहा महिन्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सध्या कार्यरत असलेलल्या त्रिसदस्यीय समितीला कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा २००६ च्या कलम १३ च्या उपकलम १ चा खंड ब पोटकलम ४ नुसार आधारे आगामी ६ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येते. यासंदर्भात सीजी-डीएल इ ०१०१२०२५ -२५९८०१ या क्रमांकाचे विशेष राजपत्र नुकतेच प्रकाशित करण्यात आले. यापुढे याच त्रिसदस्यीय समितीमार्फत जनतेच्या विकासकामांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची हि सहाव्यांदा मुदतवाढ करण्याची पहिलीच घटना आहे. मागील काही वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डांचा जवळील नगरपालिका अथवा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा प्रश्न केंद्र व राज्य शासनाकडे निर्णयाअभावी प्रलंबित आहे. त्यातही देखील ९ जानेवारी रोजी दिल्ली येथे बैठक होणार असताना अचानक हे राजपत्र प्रकाशित झाल्याने अनेकांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहे. अशातच सध्याच्या नामनिर्देशित सदस्य प्रीतम आढाव यांनी आत्मविश्वासाने सांगितले की पुढील वर्षभरासाठी आपण या पदावर राहणार आहोत.