नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं धाडकन कोसळलं
नवी दिल्ली, ता. 1 जानेवारी 2025 – हसत खेळत, दुःख आनंद म्हणत 2024 वर्ष संपलयं, आज 2025 सुरू झालेला आहे. जानेवारीचा आजचा हा पहिला दिवस आहे. या पहिल्याच दिवशी सोनं मार्केटमध्ये जर पाहायला गेला तर सोन्याच्या बाजारभावामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोनं आणि चांदीवर संपूर्ण जगाच्या लक्ष लागून आहे. कारण सोनं एक अलंकार नाही तर सोनं म्हणजे तुमच्या भविष्यातील गुंतवणूक आहे.
एक काळ होता की सोनू खूप स्वस्त होतं, जसा काळ बदलत चालला तस तसं सोनं आणि चांदीचे दर वाढत गेले. सोन्याचा भाव आता गगनाला भिडला आहे. यामध्ये चांदी पण अजीबात मागे नाही. यामध्ये चांदीने ही मोठी मजा मारली आहे. आपण बंगला, जमीन,प्लॅाट, उद्योग व्यवसाय उभारणीसाठी पैसे खर्च करतो उद्देश हाच असतो की भविष्यातील गुंतवणूक करुन त्यातून फायदा मिळविला जाईल.
१ जानेवारी २०२५ रोजी चांदी स्वस्त झाली
नववर्षाच्या दिवशीही चांदीच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. एक किलो चांदी आता ९०,५०० रुपयांवर व्यवहार करत आहे, जी काल ९२,५०० रुपयांवर होती. ही प्रति किलोग्राम २००० रुपयांची मोठी घसरण आहे.
नववर्षात सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता
तज्ज्ञांचा अंदाज आहे की येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमती वाढू शकतात. भारतीय रुपया कमकुवत होणे, रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि पश्चिम आशियातील वाढता तणाव यासारख्या घटकांमुळे सोन्याची मागणी वाढत आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळत आहेत, तर ज्वेलर्सकडून वाढत्या खरेदीमुळे किमतीही वाढल्या आहेत. याव्यतिरिक्त, मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर आणि मध्यवर्ती बँकेच्या धोरणांमध्ये संभाव्य बदल यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या घटकांचा विचार करता, नजीकच्या भविष्यात सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जर आपण भारतातील सोन्याची दर जर बघायला जर गेलं तर ते दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट 71250 आणि 24 कॅरेट चा रेट 77 हजार 710
मुंबई मध्ये सोन्याचा दर 22 कॅरेट 71100 आणि 24 कॅरेट 77510
नाशिकमध्ये आज प्रति ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्रॅम
₹७,१११
₹७,१५३
-₹४२
8 ग्रॅम
₹५६,८८८
₹५७,२२४
-₹३३६
10 ग्रॅम
₹७१,११७
₹७१,५३७
-₹४२०
100 ग्रॅम
₹७,११,१००
₹७,१५,३००
-₹४,२००
१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याच्या किमतीत थोडासा दिलासा मिळाला कारण दर ४५० रुपयांनी कमी झाले. मंगळवार, ३१ डिसेंबर २०२४ च्या तुलनेत बुधवारी सोन्याचे दर कमी झाले. भारतातील बहुतेक शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ७७,६०० रुपयांच्या आसपास आहेत, तर २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम अंदाजे ७१,२०० रुपयांच्या आसपास आहेत.