लाडक्या बहिणीप्रमाणे आता… या पुढे लाडक्या शेतकर्याच्या बॅंक खात्यांवर थेट पैसे जमा होणार …..
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोठे विधान ..!
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर, दि. १ जानेवारी २०२५ — लाडक्या बहिणीच्या योजनेप्रमाणे आता… या पुढे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर थेट पैसे जमा होणार असल्याचे माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कृषी खात्यातील पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे सर्वसामान्य समाजाची परवडत कशी थांबेल असे मत व्यक्त करताना सांगितले की या पुढे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर थेट पैसे जमा केले जाणार आहे त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल व त्याचा लाभ राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे..
शेतकरयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे आश्वासन देत त्यांनी सांगितले की आता.. या पुढे शेती क्षेत्रातील सखोल अभ्यास करून वेगवेगळ्या मार्गाने आवश्यक तेवढे बदल घडवून आणले जातील तेव्हा बळीराजा हा शासनाच्या विविध योजनांचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सिन्नर तालुक्यातील आमदार माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री झाल्यापासून पहिल्यांदा ते मंत्रालयात गेले व त्यांनी कृषी खात्यात्याचा पदभार स्वीकारला त्यावेळी ते बोलत होते. शेतकरयांना अर्ज करण्याची. तसेच त्यासाठी विविध प्रकारच्या कागदपत्रे सादर करावी लागणार नाही.
या पुढे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर थेट पैसे जमा केले जाणार आहे त्यामुळे सरकारी यंत्रणेने लाडक्या बहिणीच्या योजनेप्रमाणे आता पुढे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर थेट पैसे जमा केले जाणार आहे तशी योजना तयार केली जाईल व ती लवकरच अमलात आणली जाईल असे आश्वासन दिले.
कृषी क्षेत्रातील औषधे व पोषक घटक आणि किटकनाशक यांच्या गुणवत्ता आणि दर्जा हा ढासळत चालला आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा आणखी अडचणींत येत आहेत हे लक्षात घेऊन या संदर्भात ठोस निर्णय घेण्यात येईल व संबंधित उत्पादनांचे व वितरकाचे सत्यता पडताळून पाहण्यासाठी खास नियम व अटी यांची पडताळून पाहणे आवश्यक आहे असे वाटते.