आर्थिक

1 लाखाचे झाले 1 करोड, लोक झाले मालामाल..कसे ते पहा

Arunjyoti Bio Ventures Ltd:


वेगवान मराठी / दिपक पांड्या

नवी दिल्ली, ता. 31 डिसेंबर 2024- Arunjyoti Bio Ventures Ltd:शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात लोक गुंतवणूक करत आहे.  या गुंतवणुकीचा फायदा लोकांना होत आहे. बाजारामध्ये अशी काही शेअर्स आहे की जे अगदी कमी पैशांमध्ये सुरू होतात आणि लाखो रुपयांपर्यंत जाऊन पोहोचतात.

काही शहर तर रातोरात लोकांना परतावा देतात, त्यात काही शेअर्स मात्र अनेक दिवस रेंगाळत पडतात ,मात्र असा एक शेअर्स आहे ज्या शेअर्स लोकांना मालामाल केलेला आहे.

Arunjyoti Bio Ventures Ltd: या शेअर्स जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की हा शेअर्स चार महिन्यांमध्ये दुप्पट झालाय, 20 ऑगस्ट रोजी या शेअरची किंमत 93 रुपये होती. आज ती 190 रुपयांवर पोचली आहे. म्हणजे केवळ चार महिन्यात शंभर टक्के परतावा या शेअर्समधून गुंतवणूकदारांना मिळालेला आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

एवढेच नाही जर वर्षभराचं तुम्ही जर टारगेट ठेवलं तर 368% रिटर्न या शेअर्समधून मिळालेले आहे. याचा अर्थ तुम्हाला अंदाज आला असेल की या शेअर्समधून गुंतवणूकदार कश्या पद्धतीने मालामाल बनले. आपल्याला या शेअरच्या बाबतीत अधिक थोडं जाणून घेणे गरजेचे आहे. कारण या शेअर्सने लोकांना एक लाख रुपयांमधून एक करोड रुपये कमवून दिले आहेत. म्हणजेच एका लाखाचे करोड झाले आहेत ते कसे जाणून घेऊया. Arunjyoti Bio Ventures Ltd Share Price

कंपनीने नुकतेच या शेअरचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी हा शेअर दहा भागांत विभाजन करणार आहे.शुक्रवारी हा शेअर 5 टक्के अपर सर्किटवर होता. हा शेअर शुक्रवारी 190.10 रुपयांवर पोहचला. अजून शेअरच्या स्प्लिटचा रिकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. परंतु या निर्णयामुळे शेअरने उच्चांक गाठला आहे.

वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांचे आता 4.68 लाख रुपये झाले आहेत. म्हणजेच वर्षभरात 3.68 लाख रुपयांचा फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे.

तुम्ही जर शेअर मार्केट मधील मास्टर असाल तर तुमच्या हे लक्षात येईल. कारण या शेअर्स पाच वर्षांपूर्वी जर गुंतवणूक केली असती तर त्याचे एक कोटी झाले असते.

पाच वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर्स 1.59 रु रुपयांवर होता तो आता 190 रुपयांवर जाऊन पोहोचलाय.

त्यामुळे 11856% या शेअर्सना रिटर्न दिलेले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना या शेअर्सना मोठ्या प्रमाणात फायदा करून दिलेला आहे .

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देत नाही ही फक्त माहिती आहे.  गुंतवणूक  करण्यासाठी सल्लागाराचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!