आर्थिकमोठ्या बातम्या

दुधाचे एवढे अनुदान शेतक-यांना दिले जाणार


वेगवान नाशिक

मुंबई, ता. 30 – ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय हा जोड धंदा मोठा वरदान ठरत आहे. मात्र दुधाचे कोसळलेले भाव शेतकऱ्यांसाठी तसेच दूध उत्पादकांसाठी एक डोकेदुखी ठरत आहे. मात्र महायुती सरकारने शेतकऱ्यांना एक मोठा धीर दिला आहे.  शेतकऱ्यांना मागे अनुदान जाहीर केला आहे आणि हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहे.

एक ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर सात रुपयाप्रमाणे अनुदान दिले जात आहे या अगोदर पाच रुपये अनुदान सरकारने घोषित केला होता आणि त्यानुसार पाच रुपयाचा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले जात होतं दुधाचे दराची स्थिती जर पाहायला गेली तर ती कशा पद्धतीने आहे ते आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित पाहण्यासाठी दूध खरेदी च्या खालीवर पणामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ व खाजगी दूध प्रकल्प हे गाईच्या दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रतिलिटर सात रुपयाप्रमाणे अनुदान देतात.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

यामध्ये दुधाची गुणवत्ता ठरवण्यात आलेले आहे 3.5 आणि 8.5 फॅट एस एन एफ असं जर दूध असेल तर त्यांना 28 रुपये दुधाचा दर जाहीर करण्यात आला होता आणि त्यावरती हे अनुदान दिलं जात होतं. 8.3 एस एन एफ पर्यंत दुधाची गुणवत्ता असलेल्यांना ही योजना लागू केली जात होती.

ऑक्टोबर महिन्यामध्ये दुधाचे अनुदान पाच रुपयावरून थेट सात रुपये करण्यात आलं आणि दुधाचा जोरदार होता तो 30 रुपयावरून 28 रुपये करण्यात आला मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये दुधाची खरेदी दर जो आहे. तो 28 रुपयावरून तीस रुपयापर्यंत सुरू आहे. मात्र यामध्ये कोणत्या कंपन्या खरेदी करताय हा ज्या त्या कंपनीचा भाग आहे. मात्र आता शेतकऱ्यांना इथून पुढेही सात रुपये प्रमाणे अनुदान मिळत राहणार आहे हे मात्र खरं आहे. आणि दुधाचा भाव 29 रुपये करण्यात आल्याचे सुत्रकडून समजते तर आम्ही शेतक-यांना 30 रुपयांप्रमाणे दर आणि वर इतर अनुदान देत असल्याचे जानकीराम सोनवणे यांनी वेगवान शी बोलतांना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!