मध्य रेल्वेच्या या दोन विशेष प्रवासी गाड्यांच्या कालावधीत वाढ
नागपूर ते मडगांव आणि नाशिक रोड ते धनबाद या विशेष गाड्यांचा कालावधीत वाढ
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241230-WA0093-780x470.jpg)
वेगवान नाशिक/Wegwan Nashik:-
विशेष प्रतिनिधी, 30 डिसेंबर-
नागपूर ते मडगांव आणि नाशिक रोड ते धनबाद विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.
नववर्षाच्या निमित्ताने गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटक तर उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवासी व पर्यटकांच्या सोयीसाठी मध्यरेल्वे द्वारा अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नागपूर ते मडगांव आणि नाशिक रोड ते धनबाद दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीचा कालावधी खालीलप्रमाणे वाढविला आहे:
• ट्रेन क्र. ०११३९ नागपूर ते मडगांव द्वि साप्ताहिक विशेष दि. ०१.०१.२०२५ पासून पुढील आदेशापर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
• ट्रेन क्र. ०११४० मडगांव ते नागपूर द्वि साप्ताहिक विशेष दि. ०२.०१.२०२५ पासून पुढील आदेशापर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
• ट्रेन क्र. ०३३९८ नाशिक रोड ते धनबाद गरीबरथ द्वि साप्ताहिक विशेष दि.०२.०२.२०२५ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
• ट्रेन क्र. ०३३९७ धनबाद ते नाशिक रोड गरीबरथ द्वि साप्ताहिक विशेष दि. ३१.०१.२०२५ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
![विशेष प्रतिनिधी.](https://wegwannashik.com/wp-content/litespeed/avatar/bf4adee248a6fb1da7e8d959576b4556.jpg?ver=1737531623)