नाशिक ग्रामीण

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वीजांचा थयथयाट

Rain Update Nashik


वेगवान मराठी / मारूती जगधने

नाशिकः 27 डिसेंबर –  Rain Update Nashik बेमोसमी पावसाचा कांदा, द्राक्ष, डाळिंब, आंबा आणि इतर फळबागांवर गंभीर परिणाम होतो. पुढील काळातील तीन चार दिवस पावसाचे गारपिटीचे वातावरण असल्याने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष कांदा अंबा या फळबागांना मोठा फटका बसणार आहे. तसेच गहू हरभरा इत्यादी रब्बी पिकांवर देखील असे परिणाम होणार आहे एकंदरीत बेमुस मी पावसाने शेतीची बेसुमार नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे यासाठी शासनाला पुन्हा शेतकऱ्यांच्या मदतीला धाव लागणार आहे. आज नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले आहे.

राज्यासह देशभरात अचानक थंडीला ब्रेक लागला आहे, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

कांदा:

अतिपावसामुळे कांदा पिके सडू लागतात.
जमिनीत जास्त ओलसरपणामुळे कांद्याची गुणवत्ता खालावते आणि साठवणुकीस अडचण निर्माण होते.

राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सोबतच वादळी वाऱ्याचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान पाऊस, गारपीट आणि वादळ असं तिहेरी संकट पुढील दोन दिवस राज्यावर असणार आहे.

द्राक्ष:
पावसामुळे द्राक्षाच्या मुळांवर व पानांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.
फळे फुटण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे बाजारात मागणी कमी होते.

डाळिंब:

डाळिंबावर डाग येणे (फळमाशी, पाणीपुरवठा) आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो.
फळांची गुणवत्ता कमी होऊन निर्यात क्षमतेवर परिणाम होतो.
आंबा:

मोहोर गळतो किंवा गळण्याचे प्रमाण वाढते.
फळधारणा कमी होते व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

इतर फळबागा:

सततच्या पावसामुळे मुळांची कुज होणे, पानगळ, फळगळ आणि झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.

उपाययोजना:

बागेतील निचरा व्यवस्था सुधारणे.

. पिकांसाठी तत्काळ फवारणी (बुरशीनाशके व रोगनाशके).
. नुकसानभरपाईसाठी सरकारी मदत व विमा दावा दाखल करणे.
. पिकांची वेळोवेळी तपासणी व लागवड पद्धती सुधारित करणे.

बेमोसमी पावसाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असल्यास शेतकऱ्यांसाठी तातडीने उपाययोजना आवश्यक आहे.
नाशिक जिल्ह्यात कधी थंडी तर कधी उष्णता असे वातावरण आहे दिवसभर धुके वातावरण कायम असते धुक्यामुळे पिकांवर परिणाम होतच आहे परंतु आता बेमोसमी पाऊस होणार असल्याने त्याचे परिणाम पिकांना होणार आहे शेतकरी या बेमोसमी पावसाने शेतकरी पुरा नागावला जाणार आहे.

तालुका निफाड जिल्हा नाशिक ओझर कसबे सुकाना नानेगाव शिंदे पळस पावसाला सुरुवात


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!