महाराष्ट्रातून जाणार भारतातील सगळ्यात मोठ्या महामार्गाचे काम सुरु
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/12/नाशिक-मधील-महामार्ग-780x470.jpg)
मुंबई, ता. 26 – महाराष्ट्र मधून सगळ्यात मोठा महामार्ग जात आहे हा भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग मानला जातोय यामुळे अनेकांच्या जमिनी ग्रहण लागलेला आहे. या बदल्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप होतं आणि वाटप पण झालेला आहे. आता हा महामार्ग कशा पद्धतीने जाणार आहे. यामधून महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे, हे आपल्याला आज जाणून घ्यायचा आहे.
1350 किलोमीटर लांबीचा असलेला हा महामार्ग मोठ्या शानदार पद्धतीने होत असून या महामार्गाचा आकर्षण संपूर्ण भारताला असणार आहे. कारण हा महामार्ग थेट दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे ला टक्कर देण्यासाठी सज्ज झालेला आहे.हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग आहे .
भारत देशामध्ये जवळजवळ 550 जिल्ह्यामध्ये अंदाजे 65 हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग आणि द्रुतगती महामार्गाचे जाळं तयार केलं जात आहे. दिल्ली ते मुंबई द्रुतगती महामार्ग आदेशातील सर्वात लांब मृत्यगती महामार्ग ठरला आहे. या महामार्गाचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
1350 किलोमीटरचा असलेला हा महामार्ग सात राज्यांना जोडणार आहे. सध्या मध्य प्रदेश मधील 245 किमी महामार्गावर वाहतूक सुरू करण्यात आली तर देश विदेशात सुध्दा दिल्ली- मुंबई महामार्गाची चर्चा सुरू आहे. आता एक मोठी भर पडणार आहे ती म्हणजे या नव्या आणि भारतातील दुस-या कम्रांकाच्या महामार्गाची. भारतातील सर्वात लांबीचा दुसरा महामार्ग हा एक्स्प्रेसवे म्हणजे सुरज चेन्नई एक्सप्रेस वे 1271 किमी लांबीचा हा महामार्ग असणार आहे. भारतातील हा दुसऱ्या क्रमांकाचा महामार्ग म्हणून संबोधला जाईल.
सुरत-चेन्नई एक्स्प्रेस वेच्या निर्मितीमुळे 1600 किमीचा प्रवास 1270 किमी अंतरावर होणार आहे. सध्या या प्रवाससाठी जवळपास 35 तास लागतात, परंतु हा एक्सप्रेस वे सुरू झाल्यानंतर हाच 35 तासांचा प्रवास फक्त 18 तासात होणार आहे. हा एक्सप्रेसवे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि दुसरीकडे तामिळनाडू या सहा राज्यांतून जाणार आहे. त्याचबरोबर तिरुपती, कडप्पा, कुरनूल, कलबुर्गी, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिकसह अन्य काही प्रमुख शहरांना हा महामार्ग जोडणार आहे. या महामार्गामुळे सुरत टेक्सटाईल व्यापार चेन्नई आयटी हबशी जोडला जाईल.
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/09/वेगवान-मराठी-लोगो-1.png)