मुसळधार पाऊस आणि गारपीट या दिवसापासून सुरु होणार
वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
नाशिक,ता. 25 – ऐन थंडीचा हंगाम सुरू असताना महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
हवामान विभागाने आपल्या सोशल साइटवरून सर्वांना अपडेट दिलेला आहे हवामान विभागाचा हे अपडेट शेतकऱ्यांच्या मनात धास्ती भरवणार आहे कारण ऐन कांद्याचा सीझन असल्यामुळे नाशिक जिल्ह्याला याचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे.
यंदा महाराष्ट्र मध्ये मुसळधार अशा पावसानं हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणी पाणी झालं होतं. यामुळे पावसाची झीज यावर्षी भरून निघाली. यावर्षी शेतामध्ये चांगली पिकं आली. कांद्याचे पीकही यावर्षी जोमात आलं.
आता सौर पॅनल लावण्यासाठी सरकार देणार पैसे
कांद्याचे बाजार भाव कोसळलेले असतानाच अचानक आसमानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांवरती उभं टाकलेला आहे. कारण येणाऱ्या दोन दिवसांमध्ये नाशिक सह महाराष्ट्राच्या अनेक भागात गारपीट आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहेत.
राज्यामध्ये २७ आणि २८ डिसेंबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये दुपारपासून मेघगर्जनेसह पाऊस पडण्यास सुरुवात होईल.
बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांमध्ये शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२९ डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहिला मिळेल आणि ३० डिसेंबरपासून पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्याला मोठा फटका बसणार
नाशिक जिल्हा कांद्याचा आगार म्हणून ओळखला जातो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन आलेला आहे. कांद्याचे बाजार भाव घसरलेले असल्यामुळे शेतकरी कांदा काढणीकडे वळाला आहेत. पाहिजे त्या प्रमाणात मजुरी देऊन शेतकरी कांदा काढत आहेत.
आता सौर पॅनल लावण्यासाठी सरकार देणार पैसे
त्यात अवघ्या दोन दिवसात मुसळधार पावसाची संकेत मिळत असल्यामुळे कांद्याचे मार्केट अजूनच खाली आलेला आहे.ऐन हंगामा मध्ये कांद्याचे भाव कोसळले आणि त्यात पावसाचे संकेत असल्यामुळे आता शेतकऱ्यांपुढे एक मोठं संकट उभं टाकलेला आहे. या संकटातून आता शेतकऱ्यांना सावरणा कठीण जाणार आहे.
आता सौर पॅनल लावण्यासाठी सरकार देणार पैसे
शेतकऱ्यांना यावर्षी फक्त मका पिकाने तारले आहे. अनेक हुशार शेतक-यांनी खरीब हंगामामध्ये मका पाच महिन्यात दोन काढून मुरघासासाठी 40 हजार रुपये एकरी प्रमाणा दोनदा मुरघासाचे उत्पन्न घेऊन 80 हजार कमाई केली तर दुसरी अनेक शेतक-यांना मक्याचे दाने काढल्यामुळे एकचं पिक घेता आले. त्यामुळे मकाचा मुरघासासाठी विक्री करणारे शेतकरी फायद्यात ठरले दुप्पट उत्पन्न मकातून मिळविता आले.
आता सौर पॅनल लावण्यासाठी सरकार देणार पैसे
कांदे झाकुन ठेवणे महत्वाचे ठरणार आहे. वीजांचा कडकडाट होणार असून झाडाखाली कोणीही उभे राहू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.