नाशिकःहे लोक रात्री येऊन तुमच्या घरात घुसतात

वेगवान नाशिक / मारुती जगधने
नाशिक, ता. 23 जिल्ह्यात चोरांचे घरफोडीचे प्रमाण वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. याच दरम्यान, पोलिसांनी मनमाड येथील 4 संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. आरोपी घरफोड्या करणाऱ्या गटाचे सदस्य असल्याची शंका आहे. मनमाडमध्ये झालेल्या या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या साहित्यासह काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.
पोलिसांच्या तपासात हे समोर आले की आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी एकापेक्षा अनेक घरफोड्या केल्या होत्या. या आरोपीनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली आहे की, त्याच्या गटाचे सदस्य आसपासच्या विविध गावांमध्ये घरफोड्या करत होते.
पोलिसांनी आरोपीला अटक केल्यावर त्याच्याकडून अधिक माहिती मिळवून चोरट्यांच्या गटाचा पर्दाफाश करण्याचे काम सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्यात घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे स्थानिक पोलिस अधिक सतर्क झाले आहेत आणि त्यांनी चोरांची गडबड थांबवण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे घर फोडी प्रकरणातील संशयित आरोपी मनमाड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा तपास मनमाड पोलीस करीत आहे. घटनेतील आरोपींकडून मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आले आहे.
या घटनेने मनमाड परिसरात एकच खळबळ उडाली आहे एका लॉजवर हे आरोपी असल्याचे उघड झाले. दिनांक 20 /12/ 24 रोजी रात्री 22ः 25 वाजेच्या सुमारास पोलीस शिपाई रणजीत चव्हाण यांना गोपनीय माहितीवरून मिळालेल्या बातमीच्या आधारे मनमाड शहर पोलीस स्टेशन कडे पोलीस पथक श्रीराम चौक मनमाड जवळील महाराज लॉज चे पहिल्या मजल्यावर गेले असता तेथे चार संशयित इसम दिसून आले .
पोलीस हे त्यांच्या मागावर असल्याचा संशय असल्याने त्यापैकी एक इसमाने पोलिसांना जोराचा धक्का देऊन पळून जाण्यासाठी बाल्कनीतून खाली उडी मारली तो इसम खाली जमिनीवर पडल्याने त्याचे दोन्ही पायाला मार लागून दुखापत झाली.
त्याला व इतर इसमांना सामानासह ताब्यात घेतले ताब्यात घेतल्या इसमानांची नावे श्रावण भालेराव वय 24 वर्षे राहणार जनार्धन नगर नांदूर नाका नाशिक, रोशन बाळनाथ पगारे वय 24 राहणार अश्विनी नगर मनमाड मूळ राहणार दत्ताचे शिंगवे तालुका चांदवड जिल्हा नाशिक, अमन हिरालाल वर्मा वय वर्षे 50 राहणार अंधेरी गुलमोहन कासरोड नंबर 7 समता नगर अंधेरी वेस्ट मुंबई, सोमनाथ हरिचंद्र त्रिभुवन वय 39 वर्ष राहणार जाधव संकुल अंबड लिंक रोड नाशिक हल्ली राहणार भिवंडी पाण्याची टाकी बाजूला असे असून त्याची अंग झडती घेतली असता एक अंगठी बनावट कट्टा व तीन जिवंत काडतुसे अंदाजे पाच तोळे सोनचे दागिने तीन मोबाईल रोख रक्कम,
घासून तयार केलेले घरपोडीचे हत्यार एक छोटे कटर मुद्देमाल मिळून आला तसेच आरोपी श्रावण भालेराव यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मोटरसायकल, मोबाईल चोरी ,घरफोडी करणारा असून त्याने व अमन हिरालाल वर्मा याने भिवंडी येथील धामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान घरफोडी करून चोरून आणलेले सोने विक्रीसाठी व घरफडी चोरी करण्यासाठी मनमाड शहरात आले होते.
सशयीत आरोपी हे सर्वजण अभिलेखा वरील सराईत गुन्हेगार आहे. संशयित आरोपीवर मनमाड शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 734/ 2024 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 132 /3 कंसात पाच सह भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक 25 दिनांक 21/ 12 /24 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी सध्या पोलीस कस्टडीत रिमांड मध्ये आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक हेमंत बंगाळे मनमाड पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई विक्रांत देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण ,अनिकेत भारतीय अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव, बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांचे सूचनेनुसार विजय करे ,पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे मनमाड पोलीस स्टेशन व पोलीस हवालदार प्रल्हाद सानप, पोलीस शिपाई रणजीत चव्हाण, पोलीस शिपाई संदीप झाल्टे ,राजेंद्र खैरनार पोलीस अमलदार मनमाड शहर स्टेशन हे करीत आहे.
