कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मुळे राज्यातील ” बळीराजाला ” बळ .. !
सिन्नर चा बुलंद आवाज विधानसभेत गाजणार....
वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि, २२ डिसेंबर — सिन्नर चे भुमि पुत्र आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गळ्यात राज्याच्या कृषी मंत्री पदाची माळ घातली आणि ” अश्रुंची झाली फुले. ! अशी अनुभूती देणारी श्री कोकाटे यांचे सर्वाधिक कौतुक केले जात आहे.. आता यापुढे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सिन्नर चा बुलंद आवाज विधानसभेत गाजणार व लाडक्या बळीराजाला ” बळ ” मिळणार… कारण सिन्नर तालुक्यातील एका छोट्या खेड्यातील शेतकरी कुटुंबातील व शेती क्षेत्रातील सखोल अभ्यास आणि समस्यांची जाण असलेल्या शेतकरी भुमि पुत्र राज्यातील कृषी मंत्री या पदावर विराजमान झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य समाजाशी निगडीत प्रश्न कडे गांभीर्याने पाहिले जाईल असा विश्वास जिल्ह्यातील जनतेला वाटत आहे.
– हिवाळी अधिवेशनाच्या पुर्व संध्याला राज्यातील नवनिर्वाचित मंत्र्यांचा खातेवाटप जाहीर झाले असून सिन्नर चे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना राज्याचं ” कृषी मंत्री ” हे खाते मिळाले आहे त्यामुळे बळीराजाला या क्षेत्रातील अनुभवी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याची भावना संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी व सिन्नर सह नाशिक जिल्ह्यातील सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
सिन्नर चे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने या माध्यमातून महाराष्ट्राला हेवा वाटावा असा शेतीक्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण कुठलेही मंत्री पद नसताना गेल्या अनेक दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील विकास अख्खा महाराष्ट्र ओळखतो , कामांच्या माध्यमातून दुर्लक्षित शेतकरी व शेतमजूर यांच्या गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा आपला माणूस आपल्या साठी,,, असा धडाडीने काम करणारे मंत्री सिन्नर तालुक्यातील सोमठाणे या छोट्याशा खेड्यात अवतरले.. आता खर्या अर्थाने राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कृषीमंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांचे दि. २३ , २४ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, लासलगाव.निफाड , नाशिक रोड, नाशिक शहर येथे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.या दरम्यान श्री.कोकाटे हे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
आज सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील आपल्या निवासस्थानी आले असून त्यांची धर्मपत्नी सौ,सिमाताई कोकाटे यांनी नामदार कोकाटे यांचें औक्षण करून स्वागत करण्यात आले.
आमदार माणिकराव कोकाटे यांचा आपला राजकीय प्रवास नाशिक जिल्हा युवा काँग्रेसच्या अध्यक्ष पासुन सुरु झालेला प्रवास अखेर राज्य च्या कृषी मंत्री पर्यंत येऊन पोहला तो जनतेशी प्रामाणिक राहून फक्त विविध प्रकारच्या विकास कामांच्या जोरावर.. सिन्नर तालुक्यातील सर्व सामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्राला राज्याचे कृषी मंत्री पदाचा मान मिळाला आहे त्यामुळे तालुक्यासाठी खास अभिमान व हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचा असेल तर श्री कोकाटे यांचे मंत्रिपद राज्याला एका नवीन वळणावर घेऊन जाणारया कोकाटे यांचे सर्वाधिक कौतुक होत आहे हे मात्र नक्की.