मका पिकातून शेतकरी मालामाल होणार, असा प्रयोग होणार
वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
नाशिक, ता.22 भारत हा कृषिप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशांमध्ये शेती सर्वात प्रामुख्याने महत्त्वाची आहे. ग्रामीण भागामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचे आर्थिक साधन आहे.
सध्या शेतकरी शेतामध्ये मका पिकाची लागवड करत आहे. मका पीक सध्या शेतकऱ्यांना सर्वात मोठा वरदान पीक ठरवू लागलेला आहे, कारण सोयाबीन, कांदा आणि इतर पिकांनी शेतकऱ्यांचा पूर्णतः हिरमोड केलेला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून सोयाबीन आणि कांद्याचे भाव अत्यंत कमी होऊन जात असल्यामुळे शेतक-यांच्या पदरात काहीच राहतं नाही.
जेव्हा शेतकऱ्यांचा कांदा बाजारपेठेमध्ये दाखल होतो त्यावेळेस मात्र कांद्याचे बाजार भाव १५००, १६००, १८०० असे विकले जातात. एखांदा ट्रॅक्टर किंवा पिकअप 2500 रुपये गेली बाजार समिती पण फक्त 2500 रुपयांची बाजारभाव शेतक-यांपर्य़ंत पोहचवून शेतक-यांची एक प्रकारे बळवण करतात.
सोयाबीन पीक एकरी फक्त 5 ते 6 क्विंटल उत्पादन देऊ लागले आहे. त्यामध्ये भाव 4000 ते 4200 रुपये मिळत असल्याने शेतक-यांना यावर्षी चांगलाच फटक बसला आहे. तर कांद्याला दोन महिन्यापूर्वी चांगला भाव होता मात्र जेंव्हा बाजारामध्ये कांदे दाखल होताचं भाव 2000 हजाराच्या आत आल्याने एकरी कांद्याचा खर्च 60 हजार आणि 1 एकर मध्ये फक्त 1 ते दीड टॅक्टर कांदे निघत असल्याने खर्च आणि कांद्याचे पैसे सारखेच होतात.
मका पिकातून लाखोंची कमाई
नाशिक जिल्ह्यात खरीप हंगाम मध्ये मका पिकाची जून मध्ये शेतकरी पेरणी करतात. मका काढण्यासाठी साडेचार ते पाच महिन्याचा कालावधी जातो. जर शेतक-यांनी मका पिकाचे दाने काढेल तर एकरी 22 ते 26 क्विंटल मका निघते. मात्र मकातून जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेतक-यांनी एक नामी शक्कल लढविली आहे.
काय आहे मकातून डब्बल कमाई कऱण्याची पध्दत
जूनमध्ये मका पेरणी केल्यानंतर अनेक शेतकरी त्याची अडीच महिन्यामध्ये जनावरांचा मुरघास साठी कापणी करतात. म्हणजे मका लागवड केल्यानंतर तिला 70-ते 75 दिवसांमध्येच कुट करण्यासाठी मक्याची गाय पालन करणा-या शेतक-यांना एकरी 40 ते 45 हजार रुपये दराप्रमाणे विक्री करतात. मकाची कापनी झाल्यानंतर चार दिवसातच शेतकरी पुन्हा मकाची पेरणी करतात आणि आणि पुन्हा 70 ते 75 दिवसामध्ये मक्याचा दान्याची स्टेज ही चिकामध्ये असते. या पध्दतीने मका मुरघासाठी विकली जाते. जेंव्हा शेतकरी मुरघासासाठी मक्याची विक्री करतात. दुसरीकडे पाहिले तर इतर शेतकरी मक्याचे दाने काढत असतात. आणि इकडे हे शेतकरी पाच ते साडेपाच महिन्यात दोनादा मुरघासाचे उत्पन्न घेऊन एकरी 90 ते 1 लाख रुपयांची कमाई करुन मोकळे होतात आणि त्या ठिकाणी पुन्हा कांदा लागवड करुन डब्बल फायदा घेतात.
मक्याचे दाणे काढण्या ऐवजी मका मुरघासाला विकणे शेतक-यांना जास्त पैसे कमवून देणारे ठरले असून आता शेतकरी हुशार झाला आहे. दाने काढण्याच्या फंद्यात न पडता शेतकरी मुरघासाला मका विक्री करुन आडीच महिन्यात शेतकरी दुसरे पिक कांदाही घेण्यासाठी सज्ज असतो. मुरघास हा आडीच महिन्यात केला जातो तर दाने काढण्यासाठी साडेचार ते पाच महिने लागत असल्यामुळे मुरघास शेतक-यांना वरदान ठरत आहे. दाने काढून एकरी 50 हजार रुपये होतात तर मुरघासातून एकरी 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
पुढील वर्षी मक्याचे क्षेत्र वाढणार आहे कारण असे मका पासून इथेनॅाल तयार होत असल्यामुळे मकाचे भाव कमी होणार नसून त्याची मागणी वाढत आहे. आणि भविष्यात वाढत जाणार आहे.