केंद्र सरकार कडून गाय पालन करणा-यांसाठी मोठी योजना, 2 कोटींची सुट
साहेबराव ठाकरे
नवी दिल्ली, ता. 20 डिसेंबर 2024- व्यवसाय आणि उद्योग धंदा हा आज आपल्याला सर्वात पुढे घेऊन जाणारा ठरतो पण व्यवसायासाठी मोठा भाग भांडवल लागत आणि तेच भाग भांडवल आपल्याकडे उपलब्ध नाही यामुळे केंद्र सरकारने जर तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असेल तर एक भर भक्कम योजना राबवण्याचे ठरविला आहे.
ही योजना संपूर्ण भारतामध्ये राबविले जात असून ही योजना सगळ्यात मोठी योजना मानली जात आहे कारण या योजनेमध्ये तब्बल दोन कोटी रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे.
एक दोन लाख नव्हे तर तब्बल दोन कोटी रुपये सरकार तुम्हाला मदत करणार आहे म्हणजे दोन कोटी रुपयांचा अनुदान मिळणारी ही भारतातली सगळ्यात मोठी योजना म्हणून पाहिली जात आहे या योजनेमध्ये अनेक लोक सहभागी होत आहेत जर आपल्याला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर या योजनेची संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊया आणि दोन लाख रुपये सबसिडीचा लाभ घ्या.
गोकुळ मिशन
गोकुळ मिशन नावाने ही योजना सध्या संपूर्ण भारतामध्ये कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. गोकुळ मिशन ही योजना भारत सरकारने का सुरू केली ते जाणून घेऊया.
राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM) केंद्र सरकारने 2014 साली सुरू केले. शास्त्रोक्त पद्धतीने दूध उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत देशी गायी आणि दुभत्या जनावरांच्या जाती सुधारल्या जातात. या मिशन अंतर्गत अनेक प्रकारची कामे केली जातात,
राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM) डिसेंबर 2014 पासून देशी गोवंशांच्या विकास आणि संवर्धनासाठी राबविण्यात येत आहे. दुधाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि देशातील ग्रामीण शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर करण्यासाठी गोवंशीय जनावरांचे दूध उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे.
ही योजना राष्ट्रीय पशुधन विकास योजनेंतर्गत 2021 ते 2026 या कालावधीत 2400 कोटी रुपयांच्या बजेटसह सुरू ठेवण्यात आली आहे. RGM मुळे उत्पादकता वाढेल आणि कार्यक्रमाचे फायदे भारतातील सर्व गायी आणि म्हशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील, विशेषत: लहान आणि सीमांत शेतकऱ्यांपर्यंत. या कार्यक्रमाचा विशेषत: महिलांना फायदा होईल कारण पशुपालनाशी संबंधित 70% पेक्षा जास्त कामे महिला करतात.
जसे की:
गाय, म्हैस, डुक्कर, कोंबडी आणि शेळी प्रजनन फार्म आणि सायलेज उत्पादन युनिट्सना अनुदान दिले जाते.
एकात्मिक केंद्रे म्हणजे गोकुळ ग्राम हे देशी प्राण्यांसाठी तयार केले आहेत.
देशी जातींचे संवर्धन करण्यासाठी बैल माता फार्म मजबूत केले जातात.
स्थानिक जातींसाठी प्रजनन प्रणालीमध्ये फील्ड परफॉर्मन्स रेकॉर्डिंग (FPR) स्थापित केले जाते.
स्थानिक जातींसाठी निवड प्रक्रिया कार्यक्रम राबविला जातो.
देशी जातीच्या देशी जनावरांचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.
देशी जातींसाठी वेळोवेळी दूध उत्पादन स्पर्धा आयोजित केल्या जातात.
देशी प्राणी विकास कार्यक्रम चालवणाऱ्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.
या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला दोन कोटी रुपयांची सबसिडी देणार आहे. यामध्ये तुम्हाला गाई घेण्यासाठी, शेड बांधण्यासाठी, मिल्किंग मशीन, चाफ कटर, ट्रॅक्टर ट्रॉली घेण्यासाठी,तसेच मुरघास करण्यासाठी यंत्र, तसेच विविध प्रकारचे यंत्रसामग्री घेण्यासाठी गोकुळ मिशन अंतर्गत सरकार सबसिडी देत आहे.
हा प्रोजेक्ट तब्बल 200 गाईंसाठी आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी तुम्हाला 200 गाई घ्याव्या लागणार आहे. यामध्ये तुम्हाला एकही गाय कमी चालणार नाही. तुम्हाला आठ टप्प्यात याचे पैसे तुमच्या खात्यावर येऊन पडणार आहे. हा एकून प्रकल्प चार कोटी रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला दोन कोटी रुपये स्वताचे व दोन कोटी रुपये सरकार अनुदान देणार आहे. असे 4 कोटीची ही योजना आहे.
या योजनेत सहभाग घेण्यासाठी तुम्ही आॅनलाईन अर्ज करु शकतात. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार मार्फत या योजनचे कामे सुरु आहे.