केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेध मोर्चात जमावाला भडकवल्याने पाच सहा जणांकडून दुकानांची तोडफोड
देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल
वेगवान नाशिक/Wegwan Nashik :-
विशेष प्रतिनिधी,
आज गुरुवार दि.१९ रोजी येथील जुन्या बस स्थानक येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुकारलेल्या बंद दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चात जमाव भडकेल असे वक्तव्य केल्याने जमावातून पाच ते सहा जण बाहेर पडत रेस्ट कॅम्प रोडवरील एका दुकानात तोडफोड केली म्हणून देवळाली कॅम्प पोलिसात हवालदार राजेंद्र मोजाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वादग्रत वक्तव्य केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे शहरप्रमुख लेखन डांगळे यांनी आज दि.१९ रोजी सर्व समाज बांधवांच्या वतीने पूर्णपणे कडकडीत बंद पुकारण्यात येत आहे असा अर्ज सादर केला होता. त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशान्वये १) भिमराव (लखन) डांगळे रा.जुनी रटेशनवाडी, देवळाली कॅम्प, नाशिक यांना दि.१८ डिसेंबर रोजी भारतीय न्याय संहिता कलम १६८ प्रमाणे नोटीस अदा करुन त्यांना जुने बस स्टॅन्ड देवळाली कॅम्प नाशिक येथे निषेध करणार असल्याचे सांगत तसे नियोजन केलेले आहे, आपण सदर निषेध दरम्यान कोणतेही आक्षेपार्य वक्तव्य करणार नाही. तसेच दुसऱ्याच्या भावना दुखतील अशा घोषणा देवु नये व निषेध दरम्यान कोणतेही प्रक्षोभक भाषण करु नये आपण तसे केल्यास व त्यातुन कायदा सुव्यवस्था बिघडल्यास व सदर आदेशांचे पालन करण्यात काही कसुर केल्यास आपणावर प्रचलित कायदयानुसार कारवाई करण्यात येईल असे नोटीसही दिली होती व त्यांनी सदरची नोटीस स्वीकारली होती. मात्र काल दि १९ रोजी सकाळी ११ वा ते २ वा. दरम्यान भिमराव (लखन) सुधाकर डांगळे यांचे नेतृत्वाखाली जुने बस स्थानक परिसरात ४० ते ५० स्त्री- पुरूष जमवून मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. त्यादरम्यान डांगळे यांनी भाषणात “जर मोदी, शहा यांनी राजीनामा नाही दिला तर परत या महाराष्ट्रत आग लागेल” असे जमाव भडकावण्याचे उद्देशाने वक्तव्य केले. त्यामुळे येथून मोर्चेतील पाच ते सहा इसम यांनी मोर्चेतून निघुन जावून देवी मंदीर,समर्थ स्वीट व डेअरीचे कॉउंटरवरील काच फोडून जबरदरतीने दुकान बंद करण्यास आाग पाडून साक्षीदार दर्शन अशोक मोजाड यांचे दुकानाचे अंदाजे २५ ते ३० हजार रु.नुकसान केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने भिमराव (लखन) सुधाकर डांगळे, प्रज्वल नितनवरे,शंकर वाघमारे, पियुष भालेराव,यश गायकवाड,संतोष साळवे यासह अन्य एकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९०, २२३, ३२४ (४), ३५२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.