नुकसान भरपाईप्रश्नी आमदार आहिरे शेतकऱ्यांच्या बांधावर
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची केली पाहणी
वेगवान नाशिक /Wegwan Nashik :- येथील देवळाली मतदार संघातील ओढा गावासह परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या द्राक्षपीक नुकसानीची आमदार सरोज आहिरे यांनी द्राक्षबागेत जात पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल याबाबत शासनाकडे आपण दाद मागू अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली.
गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिकां द्राक्षबागांची तलाठी प्रिया पगारे, कृषी सहाय्यक सीमा बोठे, साहेबराव पेखळे, निलेश पेखळे, रंगनाथ पेखळे यांच्यासोबत पाहणी करत अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईबाबतच्या सूचना केल्या. या पावसाने पावसाने अनेक ठिकाणी द्राक्ष बागा तसेच नगदी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आमदार सरोज आहिरे यांनी सांगितले कि, देवळाली मतदार संघात पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला या नुकसानीबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले असून त्यानुसार भरपाई देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.