रस्त्याने वाहन चालविणा-यास 10 हजार रुपये दंड
वेगवान नाशिक
मुंबई, ता. महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये वाहतुकीचे नियम अजूनही पाहिजे त्या प्रमाणात कडक नाहीये त्यामुळे मोठमोठे ला अपघात घडत आहे आजही महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांकडे दुचाकी कार ट्रक ट्रॅक्टर चालवण्याचा कुठलाही पद्धतीने लायसन नाही, तरीही मोकाट पद्धतीने हे लोक कार बाईक रस्त्यावरती घेऊन पळवत असतात .
एवढचं नाही तर तुम्ही घेऊन जाणाऱ्या बाईक वरती कुठलाही नंबर उपलब्ध नसतो. त्यामुळे यामुळे गुन्हेगारीलाही मोठा वाव निर्माण होतो आणि यालाच प्रतिबंध घालण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने एक नवीन निर्णय घेतलाय आणि तो निर्णय वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आहे.
वाहतूकीचे नियम पायंदळी तुडवत असतात. लोक कुठल्याही पद्धतीला जुमानत नाही. जर वाहन चालकांनी आदेशाचे पालन नाही केले तर मोटर वाहन कायद्यांतर्गत दहा हजार रुपयाचा तात्काळ दंड घेण्यात येणार आहे..HSRP नसलेल्या वाहनधारकांसाठी ही एक चपराक असणार आहे. जर हा नियम मोडला तर वाहन नोंदणी आणि पत्ता बदलणे यासारख्या मिळणाऱ्या सेवे देखील बंद करण्यात येणार असल्याचं परिवहन विभागामार्फत सांगण्यात आलेल आहे.
1 एप्रिल 2025 पासून हा नियम लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वाहनांना 31 मार्च 2025 पर्यंत उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक असणार आहे. 1 एप्रिल 2025 पासून ज्या वाहनांवर ही नंबर प्लेट नसेल त्या वाहक चालकांवर 10,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
.HSRP काय आहे
HSRP च्या नंबर प्लेट विशेष प्रकारच्या ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असतात. या नंबर प्लेटवर परावर्तित रंग आहेत जे प्रकाशात सहज दिसतात आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सहज कॅप्चर होतात. या नंबर प्लेट्स युनिक आयडेंटिफिकेशन नंबर प्रदर्शित करतात.
किती खर्च येणार
तुम्ही जर वाहन बुकिंग केलं तर तुम्हाला त्यासाठी 90 दिवसाच्या नंबर प्लेट घ्यावी लागेल प्रवासी वाहनासाठी त्याचा खर्च 745 रुपये तीन चाकी वाहनासाठी पाचशे रुपये आणि दुचाकी आणि ट्रॅक्टर साठी 450 रुपये याची किंमत ठरवण्यात आलेली आहे