नाशिकचे राजकारण

मारकडवाडीच्या माध्यमामधून महाविकास आघाडीची नौटंकी

भाजप नाशिक महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील केदार 


वेगवान नाशिक/Wegwan Nashik :-

नाशिक ( ) सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी जास्तीत जास्त मते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांना देऊनही निकालात लिड भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना कसे दाखवत आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे. वास्तविक मतदान केंद्रांवर मतदान केल्यानंतर बाजुला आपण कोणाला मतदान केले हे दिसते. मग जर शंका होती तर तेव्हाच हरकत का घेतली नाही ? दुसरे म्हणजे लोकसभेला महाविकास आघाडीचा विजय झाला तेव्हा त्यांनी इ व्ही एम. मशिनवर आक्षेप का घेतला नाही ? म्हणजेच आपला विजय झाला की इ व्ही एम वर कोणताही आक्षेप नाही व पराभव झाला की आक्षेप घ्यायचा अशी नौटंकी काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते करत असल्याची टीका भाजप नाशिक महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील केदार यांनी म्हटले आहे. लोकसभेत महा विकास आघाडीला फेक नरेटिव्हमुळे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले.त्यामुळे ते हुरळून गेले होते. पण याउलट झाले व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. हा पराभव पचनी पडत नाही म्हणुन ते वाचाळ बडबड करीत आहेत.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार सुध्दा या गावाला भेट देणार आहेत. हा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा डाव असुन ते रडीचा डाव खेळून नौटंकी करत असल्याचे केदार यांनी म्हटले आहे. लोकशाहीत जय पराजय होत असतात. पण ते पचविण्याची जी ताकद लागते ती महा विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नसल्याचे केदार यांनी म्हटले आहे. वास्तविक शेतकऱ्यांना शेतातील विद्युत मोटारीला वीज बिल माफी, लाडकी बहीण योजनेचे दर महा १,५००/- रुपये त्यांच्या बँक खात्यात दरमहा वर्ग, शेतपिकाना १ रुपयात विमा, शेतमालाला हमीभाव, देशातील ऊस कारखानादारीला २५ हजार कोटींचे अर्थसहाय्य,जलसिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांना मोफत सौर पंप अशा प्रकारे एक ना अनेक लोकोपयोगी कामे ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्यातल्या व केंद्रातल्या भाजप सरकारने केल्यामुळेच तसेच लोकसभेत त्यांनी केलेले फेक नरेटिव्ह खोडून काढल्यामुळेच विधानसभेत महायुतीला यश मिळाले आहे. त्यामुळे महा विकास आघाडीच्या नेत्यांनी मारकड वाडीच्या माध्यमांमधून कोल्हे कुई बंद करावी व जनतेचा कौल मान्य करावा असे केदार यांनी म्हटले आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!