नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले; रब्बी हंगामातील पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान
वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
वेगवान नाशिक /दिनांक 6डिसेंबर:
नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागाला शुक्रवारी सायंकाळी एक वाजता जोराच्या पावसाने प्रचंड झोडपले.
यामुळे रब्बी पिकांना लाभ होणार असला तरी, काढणीला आलेला कांदा पीकास फटका बसणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ हवामान असून थंडीही गायब झाली आहे. तसेच नाशिक जिल्हा परिसरात शुक्रवारी अनेक ठिकाणी रात्रीच्या एक वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.
गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ हवामान आणि पावसाचे वातावरण तयार झाले होते.
दुपारच्या तीव्र उष्म्यानंतर सायंकाळी एक वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. पावसाने पाणी साचले. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात पिके वेगवेगळ्या टप्प्यात आहेत.
नाशिक जिल्ह्यात पिकांचे नुकसान
पावसाने रब्बी हंगामातील कांदा रोप, कांदा पिके , गहू ,हरबरा ,द्राक्ष आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .
लाल कांदा व इतर पिकांच मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे . याबाबत सरकारने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये