मका पिकातून आता डब्बल धमका मका पिकातून होणार मोठी कमाई
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
नाशिक,ता. 4 डिसेंबर 2024- महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी मका पीक वरदान ठरलाय, मका पिकातून शेतकरी भरगोस अशी कमाई करत आहे. मका पीक शेतकऱ्यांसाठी बंपर ठरलेला आहे. मका पिक शेतक-यांना डब्बल फायदा करुन देणारे ठरल आहे. सर्व पिकापेक्षा मका पिक सरस मानल्या जाऊन लागले आहे. सोयाबीन पिकाने शेतक-यांची जिरवल्यानंतर आता शेतक-यांनी मकातून चांगले उत्पन्न घेऊन मोठी कमाई केल्याचे 2024 च्या हंगामात समोर आले आहे.
रेंज 117 किमी,किमत59,999 मार्केट मध्ये या बाईकचा धिंगाणा
मका पीक हे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये घेतल्या जातं. खरीपामध्ये शेतकरी पावसावर मका पीक घेतात आणि त्यानंतर रब्बीमध्ये मक्याला विहिरीचे पाणी देऊन मका पीक घेतले जाते.
मका पिक शेतकऱ्यांना खूपच वरदान ठरलाय, कारण मक्याचा भाव 2250 पासून पुढे आहे. आणि सरासरी 2000 पेक्षा जास्त मिळत आला आणि मिळतो आहे. सोयाबीनचा भाव यावर्षी शेतकऱ्यांना 4200 ते 4400 च्या दरम्यान सोयाबीन विकावे लागले. सोयाबीन पिकाचे उत्पन्न कमी असून भावही अगदी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन पिकामुळे पूर्णतः वाट लागली.
रेंज 117 किमी,किमत59,999 मार्केट मध्ये या बाईकचा धिंगाणा
़सोयाबीन पिकाने शेतक-यांना एक शिकवण दिलीयं. मागील वर्षीही सोयाबीन पिकाला पाहिजे त्या प्रमाणात भाव न मिळाल्यामुळे मका मागील वर्षीही सोयाबीन पेक्षा सरस ठरली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मागील 2023 या वर्षांमध्ये ही मकाचा चांगला उत्पादन घेऊन चांगले पैसे कमावले होते. यंदाही अनेक शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात मक्याचे पिक घेऊन कमाई केली. मात्र आता शेतकऱ्यांसाठी मका पिक डब्बल धमाका म्हणून कमाई करुन देत आहे.
रेंज 117 किमी,किमत59,999 मार्केट मध्ये या बाईकचा धिंगाणा
मुरघास हा कमाईचा डब्बल धमाका
मकाला बाजारात मोठी मागणी आहे.मका पिक लागवड केल्यानंतर ती साडेचार ते पाच महिण्यात शेतातून काढली जाते. मात्र जर शेतक-यांनी डोकं वापरुन मक्याचे 70 ते 80 दिवसातचं मुरघासाठी मका विक्री करण्याचे नियोजन करुन पुन्हा त्वरीत मक्याचे लागवड केल्यास खरीप हगांमात दोन वेळा मक्याचे मुरघासाचे उत्पादन घेत येणे शक्य होतं आहे. अनेक शेतकरी मक्याचा आडीच महिन्यात मुरघास करुन त्यानंतर कांदा लागवड करुन दुसरं पिक त्वरीत घेऊन त्यातून कांद्याचे उत्पादन घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी तिसरं पिक हे मुरघासाचे घेतल्या जाऊ लागले आहे. त्यामुळे शेकतक-यांना मक्याचं मुरघास वरदान ठरलायं.
रेंज 117 किमी,किमत59,999 मार्केट मध्ये या बाईकचा धिंगाणा
मुरघास म्हणजे काय
मुर घासामुळे दुधाळ गाई, म्हशी,शेळी, मेंढी यांच्या आहारामध्ये प्रोटीन युक्त चारा म्हणून पाहिले जाते. मुरघासामुळे गाई, म्हशी यांचे दुध देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून दुध टिकवून राहते. दुधातून शेतक-यांचे मोठं उत्पादन मिळते.
रेंज 117 किमी,किमत59,999 मार्केट मध्ये या बाईकचा धिंगाणा
मका पिक 75 दिवशाची होताचं तो कटीन करण्यासाठी वापरल्या जातो. मक्याचा चारा हिरवा असतानाच त्याला आलेल्या मकाच्या कंसासह कुट्टी मशीन मध्ये त्याची कटीन करून तो एका बंदिस्त बॅगमध्ये बंद केल्यानंतर 45 दिवसात तो जनावरांना देण्यासाठी योग्य होतो. याला काही ठिकाणी मक्याचा आचार म्हणजे एक प्रकारे आपल्या जेवणातील लोणच्या प्रमाणे ते जनावरांच्या जेवनातील लोणचं आहे. आंबे नसतांना जस आपण लोणचं खातो. तसं हिरावा चारा नसतांना जनावरांना वर्षभर मुरघास रुपाने हिरावा चाराचं मिळतो.
रेंज 117 किमी,किमत59,999 मार्केट मध्ये या बाईकचा धिंगाणा