सिन्नर : पाथरे शिवारात लक्झरी बस व ऊस ट्रॅक्टर यांच्यांत भिषण अपघात एकाचा मृत्यू
शिर्डी - मुंबई हायवेवर वरील घटना...
वेगवान नाशिक. / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर दि.२ डिसेंबर २०२४ — ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकर ड्रायव्हर च्या चुकीच्या मार्गाने वाहतूक प्रवास करताना अपघात झाला असून मोठीं दुर्घटना टळली असली तरी तिन जणं गंभीर जखमी झाले आहेत. पैकी जखमी असलेले ट्रॅक्टर सोबत एका व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने बस मधील प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून जखमींना पुढील उपचारासाठी कोपरगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
तालुक्यातील नाशिक – शिर्डी हायवेवर पाथरे शिवारात आज संध्याकाळी सहा वाजता च्या दरम्यान विद्युत वितरण कार्यालयासमोर लक्झरी बस व ऊस घेऊन जाणारया ट्रॅक्टर यांच्यांत भिषण अपघात झाला असून यात ट्रॅक्टर च्या ड्रायव्हर सह तिन जणं गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कोपरगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर प्रवासी सुखरूप बाहेर काढले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वावी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी दिली आहे.
आज संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान शिर्डी हुन मुंबई कडे घेऊन जाणारया खाजगी लक्झरी बस ला सिन्नर तालुक्यातील वावी गावानजीक विद्युत महामंडळ वितरण कार्यालयासमोर वावी कडून कोपरगाव कडे ऊस घेऊन जाणारया ट्रॅक्टर यांच्यांत भिषण अपघात झाला असून यात तिन जणं गंभीर जखमी झाले आहेत तर बाकी इतर सर्व प्रवासी सुखरूप आहेत. .. रात्री उशिरा पर्यंत तक्रार दाखल करण्यात आली असून त्यासंबंधी अधिक माहिती घेऊन गुन्हा नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
सध्या साखर कारखाना यांचं गाळप हंगाम सुरू झाला आहे. कोपरगाव तालुक्यात कोळपेवाडी ( गौतम नगर ) येथील सहकारी साखर कारखाना आमदार आशुतोष काळे यांच्या ताब्यात आहे तर कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना हा.आमदार बिपिन कोल्हे यांच्या ताब्यात आहे. ऊस वाहतूक व्यवस्था सक्षम नाही तोपर्यंत असा प्रकार सतत घडत असतात. हे दोन्ही कारखाने सिन्नर तालुक्यातील पुर्व भागात अनेक गावांतील शेतकरी व ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणात आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी व ट्रॅक्टर यांच्या साहाय्याने जिवघणारी वाहतूक करण्यात येत असून त्यासाठी रस्ता तयार न करता बिनधास्त प्रवास करत आहे. दरवर्षी अनेक घटना घडल्या आहेत. आशा घटना टाळण्यासाठी संबंधित साखर उद्योग प्रशासन विभाग व संचालक मंडळ यांनी ऊस क्षेत्र असलेल्या गाव रस्ता तयार करावा व मगच अशी जिवघणी वाहतूक करावी.अशी मागणी पुर्व भागातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी केले आहे.