जिल्हातील आपले-सरकार सेवाकेंद्र चालकांशी आयुक्तांनी काय साधला संवाद पहा…
नाशिक राज्यसेवा हक्क आयुक्त कार्यालयाचा तृतीय वर्धापन दिन
वेगवान नाशिक/Wegwan Nashik
विशेष प्रतिनिधी दि. ०३ डिसेंबर-
राज्यसेवा हक्क आयोग कार्यालय, नाशिक यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्य सेवा इक्क आयुक्त, नाशिक ह्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे दि. २ डिसेंवर रोजी दुपारी चार वाजता नाशिक जिल्ह्यातील आपले-सरकार सेवाेंद्र चालक यांच्यासाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले,
सदर कार्यकमाचे सूत्रसंचालन जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेच्या तहसीलदार श्रीमती मंजुषा घाटगे यांनी केले. सत्राची सुरुवात आयोंग कार्यालयाचे उपसचिव श्री. सुनील जोशी यांच्या सादरीकरणाने झाली. त्यावेळी त्यांनी लोकसेवा हक्क कायद्याचे जनतेच्या ृष्टीने महत्व, जनतेला ऑनलाइन सेवा देण्याच्या प्रक्रियेतील आपले-सरकार सेवाकेंद्रचालकांची मध्यवर्ती भूमिका इत्यादिबाबत उपस्थित केंद्र चालकांना माहिती दिली.
तसेच जनतेसाठी ऑनलाईन अपिलांची सुविधा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध झालेली असल्यामुळे सदर सुविधेचा वापर कशा प्रकारे करता येईल याबाबतचे प्रात्यक्षिक जिल्हा तांत्रिक समन्वयक श्री. राहुल देवरे यांनी उपस्थितांना दाखविले. तद्नंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील डपिल्हाधिकारी(प्रशासन) श्री तुकाराम हुलावले यांनी आपले-सरकार सेवाकेंद्र चालवितांना चालकांनी कोणती दक्षता घ्यावी ह्याबाबत उद्बोधन केले
सत्राचा समारोप नाशिक विभागाच्या सेवा हक्क आयुक्त सौ. चित्रा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाने झाला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील प्रमुख तरतुदींचा उल्लेख करून महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर आज अखेर ३८ प्रशासकीय विभागांच्या एकूण ७७o सेवा या कायद्याखाली अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ४८५ सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलबध असल्याची माहिती त्यांनी दिली.
जनता व प्रशासनामधील दुवा म्हणून काम करीत असतांना केंद्र चालकांनी कोणकोणत्या जवाबदाऱ्या पार पाडाव्यात हे सांगून, नियमांचे कसोशीने पालन करतांना जनतेशी सहकार्याने वागावे व प्रशासनाची प्रतिमा उजळ राहील ह्याची काळजी घ्यावी असेही प्रतिपादन आयुक्तांनी ह्या वेळी केले. तसेच केंद्र चालकांनी विचारलेल्या विविध मुद्यांसंदर्भात आयुक्त यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तसेच आपले सरकार सेवाकेंद्र चालक यांना आवश्यक त्या सूचना दिल्या व कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमास राज्यसेवा हक्क आयोग कार्यालयाचे अधिकारी प्रशांत घोडके हे देखील उपस्थित होते.