येथे रंगलेल्या ‘खेळ मांडीयेला’ कार्यक्रमाला महिलांची तोबा गर्दी
बक्षीसांची लयलूट: सुवर्णा धामणे यांना मानाची पैठणी
वेगवान नाशिक/Wegwan Nashik :-
विशेष प्रतिनिधी २ डिसेंबर –
लाडशाखीय वाणीसमाज नवहितगुज महिला मंडळातर्फे आयोजित आणि आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडियेला’ हा भव्य दिव्य कार्यक्रम दोन हजाराहून अधिक महिलांच्या उपस्थितीत गायकवाड सभागृहात पार पडला.
मंडळाच्या अध्यक्षा उज्वला कोठावदे व कार्यकारीणीने उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानले.आदेशजीच्या प्रश्नांना हजरजबाबी उत्तर देण्याची कला पाहुन सर्वांचे चेहरे आनंदाने खुलले होते.महिलांचे संघटन मजबूत करण्यास यामुळे मदत झाल्याचे उज्वला कोठावदे यांनी सांगितले.चार तासांहून अधिक काळ चाललेल्या कार्यक्रमात मानाच्या पैठणीच्या मानकरी सुवर्णा धामणे या ठरल्या.प्रतिभा कोठावदे(द्वितीय), त माधवी येवला(तृतीय),अनिता कोठावदे(चतुर्थ) तर वैशाली मेतकर हिने पाचव्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले.लकी ड्रॉ पैठणीच्या विजेत्या स्वाती रजनीश नावरकर ठरल्या.अन्य 300 महिलांना चांदीची नाणी मिळाली.चेतन राजापूरकर सराफ
व सोनी पैठणीचे संचालक श्रीनिवास सोनी तसेच लाडशाखीय वाणी समाजातील पडद्यामागून मदत करणाऱ्या असंख्य दानशूरांचे उज्वला कोठावदे यांनी यावेळी आभार मानले.
मंडळाच्या सचिव प्रतिभा वाणी यांनी.सूत्रसंचालन तर ज्योत्स्ना मोराणकर यांनी आभार प्रदर्शन केले.जनकल्याण रक्तपेढीतर्फे थॅलेसेमियावर यावेळी प्रबॊधन करण्यात आले.