वेगवान अपडेट Gold and Silver Price Update
नवी दिल्ली, ता. 2 डिसेंबर 2024- सोना आणि चांदी आवडत नाही असं कोणी व्यक्ती नाही कारण सोनं हा नुसता आकर्षण नाही कुणी दागिना नाही तर सोना आणि चांदी या गुंतवणुकीसाठी पर्याय ठरत आहे. लोक इतर गोष्टींना प्राधान्य देण्या अगोदर सोनं आणि चांदी घेण्यावरती भर देतात. Gold and Silver Price Update
कारण सगळीकडे तुम्हाला तोटा होईल, तुम्हाला व्यवसायामध्ये तुम्हाला तोटा होईल मात्र सोन्या आणि चांदी खरेदी केल्यानंतर यामध्ये मुळीच तोटा होत नाही. त्यामुळे संपूर्ण भारतातील लोक सोन्याच्या दरावर म्हणजेच सोन्याचे दर दिवसेंदिवस कमी जास्त होतात का यावर लक्ष ठेवून असतात. कारण सोनं हे ग्रामवर विकल्या जातं आणि खरेदी केल्या जातं त्यामुळे सोनं हे ग्रॅमवर मोजल्या जात असल्यामुळे त्याचा तोळ्यावर मोठा परिणाम होतो.
आज जाणून घेऊन द्या सोन्याची महाराष्ट्र आणि देशातील स्थिती
सोमवारी, 2 डिसेंबर रोजी सोन्याच्या Gold and Silver किमतीत घसरण झाली. राजधानी दिल्लीत, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम ₹78,140 पर्यंत घसरला, हा कल चंदीगड आणि जयपूर सारख्या शहरांमध्येही दिसून आला. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,990 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला.
कोटक सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी रिसर्चचे प्रमुख अनिंद्य बॅनर्जी यांनी सांगितले की, सोन्यावरील तेजीचा दृष्टीकोन कायम आहे. MCX वर सोन्याच्या किमती ₹77,000 प्रति 10 ग्रॅम पर्यंत वाढू शकतात असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. येथे 22-कॅरेट आणि 24-कॅरेट सोन्यासाठी प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमतींचे ब्रेकडाउन आहे:
प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती
दिल्ली:
24-कॅरेट सोने: ₹78,140 प्रति 10 ग्रॅम
22-कॅरेट सोने: ₹71,640 प्रति 10 ग्रॅम
चेन्नई
24-कॅरेट सोने: ₹77,990 प्रति 10 ग्रॅम
22-कॅरेट सोने: ₹71,490 प्रति 10 ग्रॅम
हैदराबाद:
24-कॅरेट सोने: ₹77,990 प्रति 10 ग्रॅम
22-कॅरेट सोने: ₹71,490 प्रति 10 ग्रॅम
जयपूर आणि चंदीगड:
24-कॅरेट सोने: ₹78,140 प्रति 10 ग्रॅम
22-कॅरेट सोने: ₹71,640 प्रति 10 ग्रॅम
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 77,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 1 डिसेंबरला सोन्याचा दर 77,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर आठवडाभरापूर्वी सोन्याचा भाव 75,430 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
चांदीचे भाव
चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली. 1 किलोग्रॅम चांदीचा दर ₹100 ने घसरून ₹91,400 प्रति किलोग्रॅमवर स्थिरावला. मात्र, दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव ₹1,300 ने वाढून ₹92,200 प्रति किलोग्रॅमवर पोहोचला.
आशियाई बाजारात, शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी चांदी 1.94% ने वाढून $31.15 प्रति औंस झाली. बॅनर्जी यांच्या मते, नजीकच्या भविष्यात MCX वर चांदीच्या किमती ₹93,000 प्रति किलोग्रॅमवर जाण्याची शक्यता आहे.