नाशिकचे राजकारण

सरकार आलं तर मी शरद पवार यांना सोडणार… उदय सांगळे

आणि पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करणार


वेगवान नाशिक  / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर : दि , २८ नोव्हेंबर — सिन्नर विधानसभेत झालेल्या पराभव मी सस्विकारला आहे.   लोकांनी दिलेला कौल मान्य केला. लाखभर मतं मिळाली हे पाठबळ मिळाले त्यामुळे सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली आहे परंतु सध्या विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांकडून मी पक्ष सोडून शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्याबरोबरचा जुना व्हिडिओ दाखवून तालुक्यातील जनतेत व माझ्यावर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम चालू आहे ते थांबवावं.कारण जनतेला सर्व समजतं हे लक्षात घ्यावे.अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( शरदचंद्र पवार गट ) पराभूत उमेदवार उदय सांगळे यांनी वेगवान शी बोलताना सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारली तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला.‌यात सिन्नर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांच्यात खरी लढत झाली असून या लढतीत कोकाटे यांनी बाजी मारत निर्विवाद बहुमत मिळाले.व विजयी झाले आहेत.या मतदार संघात उदय सांगळे यांचा पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे विरोधात गद्दार म्हणून फलक बाजी करण्यात आली.त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस असल्याचे समोर आल्याचे पाहायला मिळत आहे.

या विधानसभेत सिन्नर मतदार संघात एकुण – २४२११५ मतदानापैकी नवनिर्वाचित आमदार माणिकराव कोकाटे यांना १३८५६५ मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उदय सांगळे यांना ९७६८१ मतं मिळाली आहे . या निवडणुकीत सिन्नर चे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपला गड कायम राखला असून ते पाचव्यांदा आमदार झाले आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

सिन्नरच्या वडझिरे गावात खासदारांना गाव बंदीचा फलक झळकला आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर अजित पवार गटाचे आमदार कोकाटे यांनी विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे  यांच्या कुटुंबाचे आभार मानले होते. तसेच सिन्नर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ माजी आणि अजित पवार गटाचे आमदार कोकाटे यांचा फोटो असणारी बॅनर धडकल्याने संभ्रम निर्माण  झाला आहे. वाजे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन संशायाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर अज्ञानता कडून गाव बंदी चा फलक लावण्यात आला होता. ग्रामपंचायत तिने  एकोपा टिकवण्यासाठी तातडीने फलक हटवून फलक लावणाऱ्या आणि त्यांचं समर्थन करणार्या चा निषेध व्यक्त केला आहे. यासंदर्भात उदय सांगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की. काय झाले अन् काय झाले.कोण माझ्याबरोबर होते आणि कोण नव्हते हा आता माझ्या दृष्टीने भूतकाळ झाला आहे जे माझ्याबरोबर नाहीत ते सुद्धा माझ्याबरोबर यापुढे कशे येतील अशा सकारात्मक दृष्टिकोनातून सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणे पसंत केले आहे त्यामुळे सर्वसामान्य समाजाशी निगडीत असलेल्या कामांना प्राधान्य दिले जाईल व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देत त्यांनी स्पष्ट केले  की  सरकार कोणाचे ही येऊद्या मी कुठेही जाणार नाही अखेर पर्यंत शरदचंद्र पवार यांच्याबरोबर राहणार आहेत. असा स्पष्ट खुलासा श्री.सांगळे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान सोशल मीडियावर खासदार राजाभाऊ वाजे यांच्या विषयी काही चुकीच्या पोस्ट टाकण्यात आल्या. आमच्या गावात येण्यास बंदी अशी  विधाने करण्यात आली होती. याबाबत सांगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली या पोस्टची मी अजिबात सहमत नाही. कार्यकर्त्यांनी यापुढे अशा प्रकारच्या पोस्ट टाकू नये असे आव्हान महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार उदय सांगळे यांनी केले आहे. तसेच निवडणूक लढताना माझ्या बाजूने ज्या कमतरता राहिल्या . मी कुठे कमी पडलो त्या कमतरता भरून काढण्यासाठी यापुढे प्रयत्नशील रहिल.विरोधी पक्षाचा पराभूत उमेदवार म्हणून  माझी भूमिका मला या पुढे बजवयाची आहे. सिन्नर तालुक्यातील विकासाच्या मुद्यावर काम करायचे आहे.गोरगरीब जनतेचे प्रश्न मांडायचे आहे.असे त्यांनी सांगितले आहे

 सिन्नर तालुक्यातील जनतेने धडा घेण्याची गरज —  हि  निवडणुक मतदारांना बरेच काही सांगून जाते आहे.. परंतु तालुक्यातील नेते हे आपलीं राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी एकत्र येतात  कारण सामाजाची अचुक नस कशी धरायची हे या नेत्यांना चांगले ठाऊक आहे.तेव्हा प्रामाणिकपणे काम करणार्याची गैरसोय  तर  होत नाही ना याची दखल मात्र घेतली जात नाही.ही बाब लक्षात घेऊन कार्यकर्ते व मतदारांनी या पुढे जागरूक राहून आपल्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.. असा सवाल वाजे समर्थक करतांना दिसत आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!