या विशेष दिवशी मध्य रेल्वे चालवणार अनारक्षित विशेष गाड्या

मध्य रेल्वे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे
मध्य रेल्वेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी १२ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान ४ विशेष ट्रेन चालतील, १ विशेष ट्रेन कलबुरगि -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान चालेल.
विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे-
*(अ) नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अनारक्षित विशेष (४)*
१. विशेष गाडी क्रमांक 01262 नागपूर येथून दि. ४.१२.२०२४ रोजी रात्री ११.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल.
२. विशेष गाडी क्रमांक 01264 नागपूर येथून दि. ५.१२.२०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल.
३. विशेष गाडी क्रमांक 01266 नागपूर येथून दि. ५.१२.२०२४ रोजी दुपारी ०३.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता पोहोचेल.
थांबे:अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर.
संरचना:
विशेष गाडी क्रमांक 01262, 01264 आणि 01266 या विशेष साठी सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डब्बे.
४. विशेष गाडी क्रमांक 02040 नागपूर येथून ७.१२.२०२४ रोजी दुपारी ०१.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.१० वाजता पोहोचेल.
थांबे:-अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर.
संरचना:- विशेष गाडी क्रमांक 02040 साठी सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डब्बे.
(सी) कलबुरगि – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अनारक्षित विशेष (१)
१. विशेष गाडी क्रमांक 01245 कलबुरगि येथून दि. ५.१२.२०२४ रोजी संध्याकाळी ०६.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.२० वाजता पोहोचेल.
थांबे :-गणागापूर रोड, अक्कलकोट, सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर.
*संरचना:* २२ सामान्य द्वितीय श्रेणी.
सर्व भक्तांना/अनुयायांना विनंती आहे की कोणत्याही खोट्या बातम्या/अफवांवर विश्वास ठेवू नये.रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त भेट देणाऱ्या/प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत.
