
वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला दिनांक 20नोव्हेंबर 2024 नांदगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ हे पहाटे येवला येथे मतदान करण्यासाठी जात होते, मात्र रस्त्यामध्ये अपघातग्रस्त बस दिसताच त्यांनी तातडीने वाहन थांबवले आणि ते अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले.
मनमाड आगाराची मनमाड-शिर्डी बस (एमएच 06 एस 8428) सकाळी सहा वाजता मनमाडहून शिर्डीकडे जात होती. अनकाई गावाजवळ बस आली असता सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला.
त्याचवेळी भुजबळ हे मनमाड होऊन येवला येथे मतदान करण्यासाठी जात होते. त्यांनी अपघातग्रस्त बस पाहताच आपले वाहन थांबवण्यास वाहन चालकाला सांगितले. त्यानंतर ते तातडीने अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले.
परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यांनी तातडीने ॲम्बुलन्स बोलविण्याचे आणि पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानुसार तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर ॲम्बुलन्स अपघातग्रस्तांच्या मदतीला दाखल झाली.
या अपघातात एक जण ठार तर पंधरा जण जखमी झाले. भुजबळ यांच्यामुळे जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बस मध्ये एकूण 35 प्रवासी होते. त्यापैकी 15 प्रवासी जखमी झाले. चालक भाऊसाहेब मोठाभाऊ गांगुर्डे (गिरणारे) हे मृत झाले.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये