स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे यांच्यावर सिन्नर येथे गुन्हा दाखल
उमेदवार व महिला सह केले होते उपोषण...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दिनांक , 18 नोव्हेंबर — स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे व जिल्हा पदाधिकारी यांच्यावर सिन्नर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वराज्य पक्षाची उमेदवार शरद शिंदे यांच्या प्रचारार्थ लावणी सम्राट सुरेखा पुणेकर यांच्या कार्यक्रमास्थळी संबंधित पदाधिकारी येऊन सभा उजळून लावली व महिलांना धक्काबुक्की केली. त्यांच्यावर कठोर कार्यवाही होऊन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी स्वराज्य पक्षाचे उमेदवार शरद शिंदे यांनी सांगितले आहे. जोपर्यंत त्यांच्या कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही महिला सह उपोषण करत आहे असल्याची माहिती शिंदे यांनी वेगवानशी बोलतांना दिली .
श्री शिंदे पुढे म्हणाले की . उमेदवारी देतानाच जिल्हाध्यक्ष श्री नाठे यांनी विरोध केला होता परंतु त्यांना डावलून संभाजी राजांनी मला उमेदवारी देऊन लढायला सांगितलं आणि मी निवडणूक रिंगणात उतरून खेडोपाडी गाव पिंजून काढला आहे. व स्वतःच्या कष्टाचे पैसे खर्च करून प्राचारत सक्सरिय हभागी होतो. परंतु श्री . रुपेश नाठे यांनी विद्यमान आमदारच्या सांगण्यावरून व कुठेतरी आर्थिक मांडणी करून मला बदनाम करून माझी उमेदवारी रद्द करण्याचा डावात आहे. आणि मला पक्षातून काढून टाकलं असे जाहीर करत आहे परंतु निवडणूक तोंडावर आले असताना ऐनवेळी निवडणूक चिन्ह बदलता येत नाही. त्यामुळे हिम्मत असेल तर माझी उमेदवारी रद्द करून दाखवा असा थेट इशारा शिंदे यांनी श्री .नाठे यांना दिला आहे.
सिन्नर विधानसभा उमेदवार शरद शिंदेपाटील व महिलांचा उपोषणाचा२रा दिवस. महिलांना धक्काबुक्की करणारा व सभा,गितांचा कार्यक्रम अडथळा आणणारे समाजकंटकावर कारवाई व्हावी यासाठी उपोषण.
स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. कारण …
शरद शिंदे यांच्या प्रचारार्थ लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .. परंतु स्वराज्य पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी त्यांची सभा उधळून लावली आणि तालुका महिला अध्यक्षा व इतर महिला पदाधिकारी यांना धक्काबुक्की केली व सभा बंद पाडली अशा कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी या महिलांनी उपोषण केले होते यानंतर उशिरा का होईना एफ आय आर दाखल करण्यात आली असल्याची माहिती उमेदवार शरद शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
श्री. शिंदे सोशल मीडिया वर पोस्ट टाकून समाजाला काही प्रश्न विचारले. काय म्हणाले शरद शिंदे पहा…
उपकार ठाकरे यांनी केले म्हणून पहिल्यांदा कोकाटे आमदार झाले तेव्हा सिन्नर तालुका शिवसेना पहिला आमदार वर्गणी काढून निवडून आला आहे.श्री शरद शिंदे वर अन्याय झाला आहे असे वाटते नाही का?.हे लवकर कळेल. गोरगरीब महाराष्ट्रातील वंचितांना उमेदवारी करण्याचा अधिकार नाही का ?का श्री शरद शिंदे यांची सभा उधळली.उलट पक्षी सहानुभूती निर्माण झाली आहे. श्री शरद शिंदे यांच्या बाबतीत सहानुभूती वाढली आहे.आहे.२० वर्ष सत्तेवर असलेल्या समोरच्या प्रस्थापित कडुन हि अपेक्षा नव्हती.निवडनुक आली समाजाची आठवण येते पाच वर्षांत समाजाचा विसर पडतो.जरांगे पाटील यांना विसरून कसं चालेल. श्री शरद शिंदे बद्दल जे घडले ते निश्चितच जाहीर निषेधार्थ आहे?असं वाटतं नाही का? सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्व सामान्य माणसाला माहित आहे कोणी बोलुन दाखवत नाही पण हिसाब होणारच आहे ?
