शेती

सिन्नर तालुक्यातील या उमेदवाराला पक्षातून काढून टाकले ! पण …

अपक्ष उमेदवार कैलाश दातार यांची माघार.. ?


वेगवान नाशिक : भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर : दि. १८ नोव्हेंबर — सिन्नर प्रतिनिधी :
राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या पक्षाच्या नेतृत्त्वाखाली अधिकृत उमेदवाराला पक्षातून च काढून टाकल्याने सिन्नर तालुक्यातील शरद शिंदे यांच्यावर मोठी नामुष्कीची वेळ आली आहे..

तालुक्यातील जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी व लोकांची गर्दी जमवण्यासाठी या उमेदवाराने चक्क बाई नाचवून पहाण्याचं ठरवलं आणि प्रसिद्ध गायिका सुरेखा पुणेकर यांना आमंत्रित करून कार्यक्रमाची तारीख जाहीर करून गर्दी जमवणयाचा प्रयत्न केला…
याबाबत सविस्तर वृत्त असे की सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते शरद शिंदे यांच्यावर स्वराज्य पक्षाच्या तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली होती व विधानसभा निवडणुकीत सिन्नर तालुका मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले व त्या अनुषंगाने सिन्नर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे व प्रतिस्पर्धी उमेदवार उदय सांगळे यांच्या विरोधात प्रचाराचे रणशिंग फुंकले.. प्रचार शिगेला पोहोचला असताना मध्येच माशी शिंकली..
त्याचं झाले असं कि . आपल्या बाजूने लोकांना आकर्षित करण्यासाठी ह्या महाशय उमेदारानं पक्षाचे नेते संभाजी राजे भोसले यांच्या सह जिल्ह्यातील नेते हे माझ्या प्रचारार्थ सिन्नर येथे येणार असल्याचे खोटे सांगून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पक्षाला आतापर्यंत न विचारता जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल असे कामं केल्याने स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे यांनी श्री.शिंदे यांना पक्षातून काढून टाकल्याने आता चक्क त्यांच्या उमेदवारीलाच धोका निर्माण होऊ शकतो असे जानकरांच म्हणणं आहे.

यासंदर्भात वेगवान ने उमेदवार श्री.शरद शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संपर्क साधण्याचे टाळले..

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

तालुक्यातील निवडणूक रिंगणात उतरलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते श्री उदय सांगळे व विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्यात खरी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट असताना तालुक्यातील इतर उमेदवार यांना मोठ्या प्रमाणावर दबाव आणला जात आहे.. मतदार संघात चाललेली राजकीय उलथापालथ ह्यावरून हे लक्षात घेता आमदार कोकाटे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे व त्यांना पराभव दिसू लागल्याने त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असल्याचे तालुक्यात चित्र आहे..

 

            प्रहार जनशक्ती पुरस्कृत व दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष कैलास दातार हे निवडणूक रिंगणात उतरलेले असतांनाच अचानक त्यांनी या निवडणुकीतुन माघार घेतली असून तालुक्यांचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.. काल संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

अपक्ष उमेदवार प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास दातीर यांनी पाठिंबा देऊन आता माघार घेतली आहे युवा नेते गणेश कर्ज यांच्या मध्यस्थीने व प्रभारी कांचन भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय घेतला यावेळेस सविता जगताप पुष्पा भोसले कपिल कोतकर गणेश जगताप तनु खरे लोणारे बंधू नारायण गोसावी सुनील मुरकुटे स्वप्निल शिंदे सांस्कृतिक हॉटेल येथे बैठक घेऊन कांती शिरसाट व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!