कांद्याला रोखणे आता शक्य नाही, भाव गाठणार एवढा आकडा onion rate
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/11/कांद्याचे-भाव-वाढता-वाढे-780x470.jpg)
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
नाशिक, ता. 18 नोव्हेंबर 2024- onion rate maharashtra महाराष्ट्रात महत्त्वाचं पीक समजल्या जाणारा कांदा पिकाचे दर आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाजारामध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडत आहे. एकीकडे कांद्याचे भाव गगनाला भिडत असल्यामुळे काही लोकांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलेले आहे. मात्र गरीब शेतकऱ्याला दोन पैसे यानिमित्ताने मिळत आहे.
कांद्याचे गणित हे कोणत्याच सरकार वरती अवलंबून नाही मात्र कांद्याचे दर वाढले की टीका करुन टार्गेट करण्याचे काम विरोधी पक्ष करतात हे नियमीत तसेच चालु आहे. मग सत्तेत कोणी असेल तरी कांद्याचे भाव वाढले की टिका केली जाते.
महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा कांदा पिकवणारा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. नाशिक जिल्हा बरोबर पुणे, अहमदनगर, सोलापूर, या सह अनेक जिल्ह्यांमधून कांदा मोठ्या प्रमाणात काढल्या जातो. मात्र यंदा कांद्याचा मोठा प्रमाणात तुटवडा असल्यामुळे कांद्याचे भाव वाढतचं चालले आहे. केंद्र सरकार आता कांद्यामध्ये कोणतीच दखल देणार नसल्याने कांद्याचे भाव कमी होणे शक्य नाही.
या आठवड्यात कांद्याने किरकोळ बाजारामध्ये ₹100 प्रति किलोग्रॅम ओलांडले आहेत, गेल्या आठवड्यातील ₹70-80 प्रति किलोग्रॅमच्या श्रेणीपेक्षा तीव्र वाढ आहे. किमतीतील या अचानक वाढीमुळे देशभरातील स्वयंपाकघरांवर परिणाम होत आहे, ज्यामुळे घरातील कांद्याचा वापर कमी होत आहे. शिवाय, कांद्याच्या वाढत्या किमतीचा परिणाम कांदभाजी आणि मिसळ पाव यांसारख्या मसालेदार पदार्थांच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे.
कांद्याचे भाव का वाढले?
कांद्याचा जुना साठा संपुष्टात आल्याने, अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे वाढलेली, नवीन पिकांची उपलब्धता विस्कळीत झाल्यामुळे भाववाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात काढणीला आलेला कांदा विकायला सुरुवात केल्यानंतर भाव आणखी वाढले. सध्याच्या उच्च किरकोळ किमती ₹80-100 प्रति किलोग्राम असूनही साठवलेल्या कांद्याला अपेक्षित परतावा मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
खरीप कांद्याचे उत्पादन घटले:
ढगाळ हवामान आणि वाढलेली आर्द्रता यामुळे यंदा खरीप (पावसाळी-हंगाम) कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे. उच्च शेती खर्च: शेतात तण नियंत्रित करण्यासाठी आवश्यक तणनाशकांसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागला.
सरकारी धोरण
सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहे. त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले जाणार असून इथून पुढे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले जातील असं कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. डिसेंबर 2023 मध्ये कमी पाऊस झाल्यामुळे कांद्याचे प्रमाण अल्प निघालेले होते. आणि याच दरम्यान कांद्यावरती निर्यात बंदी घालण्यात आली होती, मात्र ही बंदी आता 2024 पर्यंत उठविण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये कांद्याचे भाव कमी होतील अशी शक्यता मुळीच नाही.
कांदा जाणार 10 हजारावर
कांद्याचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात लाल कांद्याचे नुकसान झाला आहे. त्यामुळे लाल कांदा बाजारात दाखल होत असला तरी लाल कांद्याचे बाजारात येण्याचा प्रमाण एकदम कमी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे भाव दहा हजाराचा टप्पा गाठ दिला असा तज्ञांचा अंदाज आहे.
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/09/वेगवान-मराठी-लोगो-1.png)