मोठी बातमीः नाशिक मध्ये एवढ्या नोटा सापडल्या,काय फुली चालणार

वेगवान नाशिक
नाशिक, ता. 18 नोव्हेबर 2024- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहे. मात्र आज नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे आढळून आल्यानं खळबळ उडाली आहेत.
पैशांचा मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होणार हे निवडणुकीचं ठरलेलं गणित असतं आणि त्याच अनुषंगाने नाशिक मध्ये आज मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आलेली आहे.
नाशिक मध्ये आज सकाळी एका नामांकित हॉटेलमध्ये मोठी रक्कम आढळून आली होती या संदर्भात निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकून तपास केला असता एकूण रक्कम ही 1 कोटी 98 लाख इतकी असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
ही रक्कम जयंत साठे यांच्याकडून हस्तगत केली असून या संदर्भात पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता कुमावत यांनी दिली.
निवडणुकीच्या दरम्यान मतदारांना पैशाचा आमीश दाखवून मोठ्या प्रमाणात पैशाचा वाटप होतं. यामुळे निवडणूक आयोग अशा पैशांवरती लक्ष ठेवून आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. कोणत्या वाहनांमधून काय घेऊन जात आहेत. यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहेत.
