उध्दव ठाकरे व देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येणार ?
वेगवान मराठी
मुंबई, ता. 15 नोव्हेंबर 2024- राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र ने पाहिलेला आहे. राजकारण असा एक विषय आहे की ज्यामध्ये अशक्य असं काहीच नाही. कारण राजकारण हे राजकारण असतं ते कशाही पद्धतीने फिरत, त्याला दिशा काहीच नसते हे या मागील घडामोडीवरून सिद्ध झालेला आहे.
त्यामुळे भविष्यात येणाऱ्या काळामध्ये जर असे काही बदल झाले तर आपण अचिंबित होऊ नका, याचं कारण असं नुकताच एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेली देवेंद्र फडणवीस यांची ताजी मुलाखत.
2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणाने दाखवून दिले आहे की अनपेक्षित नेहमीच शक्य असते. वैचारिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण पक्षांमध्ये युती निर्माण झाली असून, अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही गटांच्या समर्थकांना आशा आहे की माजी मित्रपक्ष त्यांचे मतभेद सुधारतील. देवेंद्र फडणवीस यांनी एक भाष्य केले आहे. यावरुन उध्दव ठाकरे व भाजपा यांची युती पुन्हा होईल यासाठी थोडी तरी संकेत शिल्लक असल्याचे या मुलाखतीवरुन स्पष्ट झाले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपची 2019 मध्ये युती तुटली. महाराष्ट्राच्या राजकारणातील सख्खे मित्र पक्के वैरी झाले. आता 2024च्या निवडणुकीनंतर युतीतले दोन मित्र परत एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यास उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत महत्वाची माहिती दिलीय.
उद्धव ठाकरेंसोबत भविष्यात कधीच युती होणार नाही हे त्यांनी स्पष्टपणं सांगितलंय. पण राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणून त्यांनी सस्पेन्स वाढवलाय. याचा अर्थ वेळ पडल्यास भाजपा व उध्दव ठाकरे यांची युती होऊ शकते हे तर या शब्दाच्या मागे खेळ तर नाही. म्हणून याचे नावचं राजकारण आहे.
ज्यांना राजकारण करायचे असेल त्यांनी आपला संयम ढळू नं देणे एवढचं म्हणणे वावगे ठरणार आहे. कारण भविष्यात जे घडणार नाही तेच घडलं आणि पुढेही तसं घडणार नाही यात नवल ते काय हे महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे. राज्याच्या राजकारण बदल होण्यास वेळ लागत नाही. हे महाराष्ट्राने पाहिले आहे.
उध्दव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी असे उत्तर दिले असे विचारताच त्यांनी पण हात जोडून जय महाराष्ट्र करत पुढील बोलणे टाळले आहे.