शेती

कांद्याचे संशोधन करणा-या अनुसंधान केंद्राचे वाजले बारा


वेगवान नाशिक / मारुती जगधने

नाशिक, ता. 14 नोव्हेबर 2024-

नाशिक जिल्ह्यातील शेतीला व शेतकर्यांना वरदान ठरलेले व शेतीला पुरक असलेले राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्र चितेगांव येथे आहे या केंद्रावर सध्या पुरेसे संशोधना अडथळे निर्माण होत आहे. या केंद्राकडे शासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होताना समजते. It is twelve o’clock at the Onion research center

नाशिक येथील शेतकरी रिसर्च केंद्र, विशेषतः राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्र (NHRDF), हे केंद्र २००८ साली शरद पवार यांच्या हस्ते चितेगाव येथे सुरू झाले होते. त्यानंतर बरीच वर्षे नाशिकमध्ये कांदा उत्पादनासंबंधित संशोधन व तंत्रज्ञानासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरले होते. परंतु २०१७ मध्ये, केंद्राचं मुख्यालय नवी दिल्ली येथे हलवल्याने या केंद्राची कार्यक्षमता कमी झाली आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

मुख्यालय दिल्लीला हलवल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना केंद्राच्या तांत्रिक सहाय्य व संशोधनाचा फायदा कमी मिळू लागला आहे. या निर्णयामुळे नाशिक केंद्राचे महत्व कमी झाले असून, संचालक नसल्यामुळे केंद्राचे कार्य थांबले आहे आणि अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत​​​​.

मुख्यालय हलवण्याचे कारण स्पष्टपणे सांगितले गेलेले नसले तरी, राजकीय हस्तक्षेप आणि केंद्रीय नियंत्रणाची गरज हे संभाव्य घटक मानले जातात. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना पुन्हा मुख्यालय नाशिकमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
सध्या येथील कर्मचार्यांचे वेतन देखील वेळेवर होत नसल्याची मौखिक तक्रार आहे .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!