माजी खासदार हरिशचंद्र चव्हाण यांचे निधन
सुरगण्यातील प्रतापगड येथे होणार अंत्यसंस्कार

वेगवान नाशिक/ Wegwan nashik –
विशेष प्रतिनिधी, १४ नोव्हेंबर-
येथील मालेगाव व नंतर दिंडोरी मतदार संघात खासदार राहिलेले हरिशचंद्र चव्हाण यांचे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अत्यावस्थ होती त्यातच आज सकाळी ६:३० वा. त्यांचे निधन झाले आहे.
पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील त्यांनी पदे भूषवली, दिंडोरीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी एअर अंबुलन्स ने दिल्ली येथे ते गेले होते, भाजपशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांना २०१९ च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने तिकीट दिले नव्हते, मात्र तरीही ते भाजपात राहून काम करत होते, त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.आज दुपारी १ वा. पर्यंत त्यांचे अंतिम दर्शन नाशिकच्या कॉलेज रोडवरील पाटील क्रं.४ येथे घेता येईल. त्यानंतर त्यांच्या सुरगाणा येथील प्रतापगड या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
