नाशिकसह मुंबई,उपनगर, ठाणे व कोकण विभागाच्या जिल्ह्यातील तरुणांनो उद्याची हि संधी सोडू नका
टीएच्या भरतीसाठी तरूणांना आवाहन

वेगवान नाशिक/Wegawan Nashik :-
विशेष प्रतिनिधी, ११ ऑक्टोबर –
तब्बल ५ वर्षानंतर लष्कराची प्रमुख छावणी असलेल्या देवळालीतील टेरिटोरियल आर्मी (टीए) च्या ११६ पॅरासह ११८, १२३ (ग्रॅनाडियर्स) या तिन्ही इन्फ्रट्री बटालियनसाठी ८१ सोल्जर व ५७ ट्रेडमनच्या एकत्रित पदांसाठी भरती होत असून उद्या मंगळवार दि.१२ रोजी नाशिक जिल्ह्यातील तरुणांसह मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे,रत्नागिरी,रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तरुणांसाठी देवळाली कॅम्प येथील आनंद रोड मैदानावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे सकाळी ४ वा. हि भरती प्रक्रिया सुरू होईल.
गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या लष्करातील पायदळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या टेरिटोरियल आर्मी ११६ (टीए) पॅराच्या सोबत टीए ११८ व टीए १२३ (ग्रॅनाडियर्स) या तिन्ही इन्फ्रट्री बटालियनसाठी ही भरती राबविण्यात येत आहे. आज सोमवार दि. ११ रोजी राज्यातील अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजी नगर, धुळे,जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, सोलापूर, सांगली व सातारा येथील सुमारे १२ हजाराहून तरुणांना संधी देण्यात आल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.
