नाशिक क्राईम
वणीतील त्या गुटखा छाप्याची चर्चा गुलदस्त्यात

वेगवान नाशिक/सागर मोर
वणी व परीसरात विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वणी पोलिसांनी अवैध व्यवसायावर चांगली करडी नजर असुन छापेमारी सुरू आहे.शहरात गुटखा छाप्याची जोरात चर्चा परंतु छाप्यात काहीच सापडले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या छाप्या बाबत परिसरातील लोकांमध्ये संभ्रम आहे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे.वणी शहरातील वणी पिंपळगाव रस्त्यालगत असलेल्या भगवती नगर मध्ये वणी पोलीस ठाण्यातील पथकाला गुप्त माहितीनुसार गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार वणी पोलीस ठाण्याचे सपोनि.सुनिल पाटील व त्यांच्या पथकाने दि.६नोव्हे.रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान छापा मारला ही बातमी शहरात पसरली आजुबाजुच्या लोकांनी तेथील हालचाली पाहिल्या परंतु पोलिसांच्या मते काहीच आढळून आले नाही.
याचाच अर्थ असा की गुप्त माहिती देणाऱ्याने खोटी माहिती दिली का नेहमीच माहिती देणारा व्यक्ती खोटी माहिती का देईल असा ही संभ्रम निर्माण झाला आहे.किंवा पोलिस पथकातील काही फितुर त्यांनी छाप्याची कल्पना गुटखा विक्रेत्यास दिली तर नाही ना असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
एक अधिकारी दोन पोलिस यांनी यात सापडलेल्या गुटख्याचा गोलमाल केल्याचे चर्चा शहरात आहे.या संदर्भात वणी पोलिस कोणाला पाठीशी घालत आहे का कारण या परिसरात गुटख्याचा घाऊक विक्री करणारा-या व्यक्तीच्या नेहमीच फे-या मारत असतो तसेच पोलिसांना गुटख्याची माहिती पुरवणारा हाच आहे.
त्यामुळेच शहरात चर्चेला उधाण आले असून की पोलिसांना खबर देणाराच प्रत्येक गुटखा विकणा-यांना गुटखा पुरवत असतो.परंतु वणी पोलिसांत मैत्रीचे मधुर संबंध असल्याने त्याच्या व्यवसायाला चांगलाच हातभार लागत आहे.
पोलीस ठाण्याचे अधिकारी या बाबत अनभिज्ञ आहे का? ही पण चर्चा आहे पत्रकार म्हणुन घेत त्याच्या आडुन अवैध गुटखा विक्री करत असल्याने निश्चितच संशयाची सुई पोलिस धार्जीन्या पत्रकारां कडे वळते.यामुळे वणी शहरात गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले खुले आम विक्री होत होती तेव्हा कमी विक्री तर गुटखा बंदी काळात विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
