नाशिकमध्ये आठवडाभर हा रस्ता निर्धारित वेळेत वापरासाठी राहणार बंद

वेगवान नाशिक, Wegwan Nashik-
विशेष प्रतिनिधी, दि.३ नोव्हेंबर:-
देवळाली कॅम्प येथील आनंद रोडवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मैदान येथे इन्फंट्री बटालियन,पॅराशुट रेजिमेंटच्या वतीने सैन्य भरती प्रकिया दि.सोमवार ०४/११/ २०२४ ते सोमवार दि. ११/ ११/ २०२४ पावेतो आयोजित केलेली आहे.या भरती प्रकियेमध्ये राज्य तसेच परराज्यातून मोठ्या संख्येने उमेदवार येणार आहे.
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले ! एवढं झटक्यात सोनं खाली आलं
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज
कै.बाळासाहेब ठाकरे मैदान देवळाली कॅम्प परिसरातील वाहतूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सामान्य जनतेच्या सोयीसाठी संसरी नाका ते त्रिमुर्ती चौक पावेतो जाणा-या व येणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद करून सदर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे.
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले ! एवढं झटक्यात सोनं खाली आलं
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज
त्यामुळे सोमवार दिनांक ०४/ ११/ २०२४ ते सोमवार दि.११/ ११/ २०२४ या कालावधीत दररोज पहाटे ३ ते दुपारी ३ वाजेपावेतो इन्फंट्री सैन्य भरती प्रक्रीया निमित्ताने संसरी नाका ते त्रिमूर्ती चौक या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करुन सदर मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणेसाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी गृह विभाग क्रं. एम.व्ही.ए – ११६/सीआर/ ३७/ टी आर दिनांक २७/०९/ १९९६ चे अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम ११९, ११६ (9)(अ)(ब) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन वाहतुक नियंत्रणासाठी खालील निर्बंध अंमलात आणणेसाठी अधिसुचना जारी करीत आहे.
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले ! एवढं झटक्यात सोनं खाली आलं
प्रवेश बंद मार्ग :-
संसरी नाक्याकडून त्रिमुर्ती चौकाकडे व त्रिमुर्ती चौकाकडून संसरी नाक्याकडे जाणाऱ्या व येणा्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. वरील नमुद कालावधीत प्रवेश बंद मार्गाचा वापर करणारी वाहने ही खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले ! एवढं झटक्यात सोनं खाली आलं
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज
१) संसरी नाक्याकडुन त्रिमूर्ती चौकाकाडे जाणारी वाहहूक ही संसरी नाका येथुन- सिलेक्शन कॉर्नर येथुन उजवीकडे वळुन झैंडा चौक – लेव्हीट मार्केंट – देवळाली कॅन्टोमेंट हॉस्पिटल समोरून- त्रिमुर्ती चौक-नविन बस स्टॅण्ड देवळाली कॅम्पकडे जातील.
२) त्रिमुर्ती चौकाकडुन संसरी नाक्याकडे जाणारी वाहतुक हि त्रिमुर्ती चौकाकडे उजवीकडे वळून देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन मार्गे लेव्हीट मार्केट – झेंडा चौक – – सिलेक्शन कॉर्नर-डावीकडे वळून संसरी नाक्याकडे जातील. वरील निर्बध हे सैन्य भरती प्रकियेकरीता दि. ०४/ ११/ २०२४ ते दि.११/ ११/ २०२४ या कालावधित दरोज पहाटे ३.०० ते दुपारी ०३.०० वा.पावेतो अमंलात राहतील. वरील सर्व निर्बंध हे पोलीस सेवेकरीता असलेली वाहने, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका यांना लागु राहणार नाहीत.
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज
तरी नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी. सदरील अधिसुचनेचे उल्लंघन करणा-यांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले ! एवढं झटक्यात सोनं खाली आलं
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज