नाशिक ग्रामीण

नवऱ्याच्या विरोधात बायको आमदारकीला उभी

नवऱ्याच्या विरोधात बायको आमदारकीला उभी


वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
नाशिक/ दिनांक 1नोव्हेंबर /विधानसभा मतदारसंघात बापा विरूध्द पोरगी विरूध्द पुतण्या अशी लढत होत आहे.
बारामतीत काका-पुतण्या निवडणूक रिंगणात आहेत.
अशातच आता कन्नड मतदारसंघात नवरा – बायको समोरासमोर उभे राहिले आहेत.

कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव मैदानात उतरल्या आहेत.

भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.

बायको आमदारकीला विरोधात उभी असल्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी संताप व्यक्त केलाय.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत असताना भाजपवर जोरदार टीका केली आहे.

हर्षवर्धन जाधव म्हणाले, आमच्या कुटुंबातील एका सदस्याला फोडून एका राजकीय पक्षाने तिकीट दिलं.

कुठेतरी या सगळ्या गोंधळाच्या पाठिमागे रावसाहेब दानवे आहेत. माझं घर फोडलं. माझ्या विरोधात साक्षात माझी पत्नी उभी करण्याचं काम केल याचा मी जाहीर निषेध करतो.
आम्ही सर्वजण आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करत आहेत. माझ्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी कोणीच उरलं नाही.

मी आणि माझी आई दोघेचं उरलेलो आहोत. ठोकून काढू शेवटी धर्मयुद्ध आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते माजी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, याच मतदारसंघात हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर शिंदे गटाने त्यांच्या पत्नी संजना जाधव यांना उमेदवारी दिल्याने हर्षवर्धन जाधव संतापले आहेत.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
त्यामुळं या मतदारसंघात पती पत्नी आमने सामने पाहायला मिळणार आहेत.
याशिवाय कन्नड मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उदयसिंह राजपूत या विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!