BSNL च्या रिचार्ज प्लॅान ने उडविली खाजगी कंपनीची झोप BSNL Recharge Plan
BSNL's recharge plan blew private company's sleep

वेगवान नाशिक / धिरेंद्र कुलकर्णी
नवी दिल्ली, ता. 1 नोव्हेबर 2024- BSNL Recharge Plan : सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL सध्या लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. भारतामध्ये सगळ्यात मोठी असणारी बीएसएनएल म्हणजे भारत दूरसंचार निगम लिमिटेड ही सरकारी कंपनी आता मार्केटमध्ये आपली पकड पुन्हा मजबूत करताना दिसत आहे. सरकारी असल्यामुळे बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन इतर प्रायव्हेट कंपनीच्या तुलनेत स्वस्त आहे.BSNL’s recharge plan blew private company’s sleep
दिवाळीसाठी महाराष्ट्रातून अधिकच्या १६ फेऱ्या
आपल्याला जसं लाईट बिल येतं घर भाडं येतं, तेच आता मोबाईलच पण झालेलं आहे. कारण मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाच्या महत्वाचा घटक बनला आहे.
लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याचे दर कोसळले ! गोल्ड मार्केटमध्ये गर्दी
दहा-पंधरा मिनिटं जर आपल्या मोबाईलचा रिचार्ज संपला असेल तर आपल्याला बेचैन होतं त्यामुळे आपण रिचार्ज त्वरित मारतो पण दिवसेंदिवस रिचार्ज मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे आणि हे आपल्याला खिशाला परवडणार नाही.
बीएसएनएल ने अनेक असे रिचार्ज प्लान काढलेत त्याचे प्लॅन आपल्याला आणि आपल्या खिशाला परवडणारे असतील सर्वसामान्य व्यक्ती ही बीएसएनएल चा रिचार्ज मारू शकतो. अगदी कमी पैशांमध्ये बीएसएनएल चा रिचार्ज केला जातो यामध्ये आपल्याला विविध सुविधा मिळतात त्या सुविधा कशा आहेत काय आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचा आहे.
बरेच वापरकर्ते त्यांचे नंबर BSNL वर पोर्ट करणे निवडत आहेत. इतर दूरसंचार प्रदात्यांच्या तुलनेत, BSNL लक्षणीयरीत्या स्वस्त रिचार्ज पर्याय ऑफर करते, ज्यामुळे ते अनेकांसाठी पसंतीचे पर्याय बनते. जुलै महिन्यापासून बीएसएनएल वापरकर्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
BSNL ने आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक योजना लाँच केल्या आहेत. आज, अतिरिक्त डेटासह ₹५०० पेक्षा कमी ७५ दिवसांची वैधता देणाऱ्या योजनेबद्दल बोलूया. हा BSNL चा ₹४९९ चा रिचार्ज प्लॅन आहे.
BSNL चा ₹499 चा रिचार्ज प्लॅन
₹499 च्या प्लॅनसह, BSNL 75-दिवसांची वैधता कालावधी प्रदान करते, दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 विनामूल्य एसएमएस ऑफर करते. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, वापरकर्ते या पॅकेजसह BSNL Tunes आणि Gamium प्रीमियम सेवेचा आनंद घेऊ शकतात.
अतिरिक्त डेटा उपलब्ध
तुम्ही BSNL सेल्फकेअर ॲपद्वारे ₹499 चा रिचार्ज प्लॅन खरेदी करता तेव्हा तुम्हाला अतिरिक्त 3GB डेटा मिळेल. हा बोनस डेटा 75 दिवसांच्या वैधतेच्या कालावधीत कधीही वापरला जाऊ शकतो.
बीएसएनएलच्या स्वस्त दरामुळे लोक इतर खाजगी कंपन्यांना सोडून बीएसएनएल कडे वळत आहे बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये बीएसएनएल अजून सक्षम होत इतर खाजगी कंपन्यांची वाट लावणार आहे यात कुठलीही शंका नाही.
मोबाईल रिचार्ज केले स्वस्त, लोकांची झुंबड
