सरकारी माहिती

दिवाळीसाठी महाराष्ट्रातून अधिकच्या १६ फेऱ्या

दिवाळी छट पूजा उत्सवानिमित्त अतिरिक्त उत्सव विशेष ट्रेन


वेगवान नाशिक/Wegwan Nashik:- 

विशेष प्रतिनिधी ,दि.३१ ऑक्टोबर,

विशेष रेल्वे तर्फे दिवाळी छट पूजा उत्सवानिमित्त अतिरिक्त उत्सव विशेष ट्रेन

मध्य रेल्वे तर्फे दिवाळी / छट पूजा सणांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन उत्सव विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः

 

१) नांदेड -पानीपत उत्सव विशेष ट्रेन*(४ फेरी)

०७४३७ उत्सव विशेष ट्रेन नांदेड येथून दिनांक १४.११.२०२४ आणि १९.११.२०२४ रोजी ०५.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पानिपत येथे १३.४० वाजता पोहचेल.

०७४३८ उत्सव विशेष ट्रेन पानिपत येथून दिनांक १५.११.२०२४ आणि २०.११.२०२४ रोजी १५.३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी नांदेड येथे ०३.०० वाजता पोहचेल.

थांबे -: पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, पळवल, न्यू दिल्ली, भोडवल माजरी

संरचना: १ तृतीय वातानुकूलित, २० स्लीपर क्लास २ गार्ड्स ब्रेक व्हॅन.

 

२) नांदेड -पटना उत्सव विशेष ट्रेन (४ फेरी)

०७६१५ उत्सव विशेष ट्रेन नांदेड येथून दिनांक ०५.११.२०२४ आणि १२.११.२०२४ रोजी १४.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पटना येथे ००.३० वाजता पोहचेल.

०७६१६ उत्सव विशेष ट्रेन पटना येथून दिनांक ०७.११.२०२४ आणि १४.११.२०२४ रोजी

०२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी नांदेड येथे ११.०० वाजता पोहचेल.

थांबे-: पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, खंडवा, इटारसी, जबलपुर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा आणि दानापूर.

संरचना: १७ तृतीय वातानुकूलित, ०२ स्लीपर क्लास , १ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह २ द्वितीय श्रेणी.

 

३) लोकमान्य टिळक टर्मिनस -छपरा उत्सव विशेष ट्रेन (६ फेरी)

०५११४ उत्सव विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ०४.११.२०२४, ११.११.२०२४ आणि १८.११.२०२४ रोजी २०.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी छपरा येथे १२.५० वाजता पोहचेल.

०५११३ उत्सव विशेष ट्रेन छपरा दिनांक ०३.११.२०२४, १०.११.२०२४ आणि १७.११.२०२४ रोजी ०५.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १८.१५ वाजता पोहचेल.

थांबे -: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नासिक, मनमाड, जळगांव, भुसावल, खंडवा, इटारसी, भोपाल, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर, लखनऊ, गोंडा, बलरामपूर, तुलसीपूर, बढ़नी, सिदार्थ नगर, आनंद नगर, गोरखपूर, पिपराइच, कप्तानगंज जं, पडरौना, दिघवा डुबौली आणि मसराख जंकशन.

संरचना: १२ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, ०४ स्लीपर क्लास, १ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ द्वितीय श्रेणी.

४) लोकमान्य टिळक टर्मिनस -दानापूर उत्सव विशेष ट्रेन (२ फेरी)

०१०७५ उत्सव विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ०२.११.२०२४ रोजी ००.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दानापूर येथे ०९.०० वाजता पोहचेल.

०१०७६ उत्सव विशेष ट्रेन दानापूर येथून दिनांक ०३.११.२०२४ रोजी १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २३.५५ वाजता पोहचेल.

थांबे -: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नासिक, मनमाड, भुसावल, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा आणि दानापूर.

संरचना: १५ स्लीपर क्लास २ गार्ड्स ब्रेक व्हॅन.

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

रेल्वे प्रशासनाकडून गैरसोय टाळण्यासाठी कृपया वैध तिकिटांसह प्रवास करा असे आवाहन करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!