महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांनी दाखल केला़ उमेदवारी अर्ज
भव्य शक्तिप्रदर्शन

वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव दि.29 ऑक्टोबर-
नांदगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी आज मोठ्या शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांच्या सोबत भाजपच्या माजी केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार,जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार संजय पवार,राजेंद्र देशमुख, सौ.अंजुमताई कांदे यांच्यासह शिवसेना,भाजप, रिपाइंचे वरीष्ठ नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुन्या तहसील कार्यालयाजवळ जाहीर सभा झाली.यावेळी महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांनी अडीच वर्षात केलेल्या विविध कामाचा उल्लेख केला.त्यात मनमाड-करंजवन पाणी योजना, नांदगाव गिरणा धरण पाणी योजना,78 खेडी पाणी योजना,शिवसृष्टी,महर्षी वाल्मिकी स्टेडियम,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज,यांचे स्मारक,सभामंडप,इदगाह,अनेक गावात शादीखाना,अनेक गावांत जलजीवन योजना या शासकीय निधीतून झालेल्या विकासकामांसह वैयक्तिक स्वखर्चाने एक लाख चष्मे वाटप,30 हजार डोळ्यांची शस्त्रक्रिया, अनेक आपत्तीग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत, अन्नधान्य,कपडे आदी मदत ही कामे केली आहेत.
भुजबळ कुटुंबाला दहा वर्षे सत्ता मिळुनही दोन इमारती बांधण्यापलीकडे त्यांचा विकास गेला नाही.आज अपक्ष उमेदवारी करून जनतेला भुलथापा देत आहेत.तरी मला पुन्हा संधी द्या. आता तालुक्यातील शेतीच्या जलसिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढची कारकीर्द घालवेन असा शब्द देतो असे ही कांदे म्हणाले.विरोधकांनी काही उमेदवार मुद्दाम उभे केले आहेत.मात्र जनता हुशार आहे.ती जातीपातीच्या राजकारणाला थारा देणार नाही.ती विकासासोबतच राहील असा माझा ठाम विश्वास आहे असे ही ते म्हणाले.यावेळी ते काहीसे भावूक झाल्याचे दिसले.

Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…