
वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.29 ऑक्टोबर-
मनमाड-नांदगाव महामार्गावर पानेवाडी जवळ दोन मोटारसायकल आणि टँकर क्रमांक एमएच 16 सीसी 5524 मध्ये अपघात झाला.
या अपघातात दोन लहान मुलांसह तीन जणांचा मृत्यू झाला तर एक लहान मुलगा व दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघातात मयत झालेले पारोळा जिल्हा जळगाव येथील असल्याचे समजते.
जखमींना मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे तर गंभीर जखमींना मालेगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…